भव्य पालखी पदयात्रेला प्रारंभ श्री.मुर्लिधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिराचा उपक्रम.
★ जिल्ह्यासह परप्राणतातील भाविकांच्या गर्दिने गजबजले हरणघाट मंदिराचे वातावरण.
★ भाविक ; भक्तानि पालखी सोहळयाचा लाभ घ्यावा समितीचे आव्हान.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील वैनगंगा नदी लगत वसलेल्या हरणघाट ( पारडी ) येथील श्री मुर्लिधर धाम कार्तिक स्वामी हनुमान मंदिर देवस्थान हरणघाट ( पारडी )च्या वतिने सालाबादा प्रमाणे यांदाहि कार्तिक पर्वावर भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन केले आहे प पु श्री संत ब्रम्हकालीन कार्तिक स्वामी महाराज चपराळा याचे परम शिष्य प पु श्री संत मुर्लिधर महाराज हरणघाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनात भव्य पालखी पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला यावेळी भाविक भक्त गणाची मोठी उपस्थिति निर्माण झाली पालखी पद यात्रे दरम्यान पालखी पूजन ; कार्तिक महाराज प्रतिमा स्थापना ; आदि पालखी पदयात्रा दरम्यान मा आमदार देवराव होळी चामोर्शी गडचिरोली विधानसभा मतदारसंघ मा प्रभाकरजी भोयर मा रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मुल मा नीलम सुरमवार नगरसेविका न.प. सावली. रमेशजी सारडा गडचिरोली. वंसतजी कामडी आर.एफ ओ.सेवानिवृत.संजयजी काळे संघ प्रचारक भंडारा जिल्हा प्रकाश पा.गड्डमवार राकेश गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य जिबगांव, मा वसंतराव कामडी आ एफ ओ सेवा निवृत्त ,मा तिलकजी वैद्य जिल्हाध्यक्ष जनता युवा मोर्च्या, राकेश दंडमवार,जक्कुलवार सर, सतीश कोतपल्लीवार, मुकेश गुरुनुले,आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते पालखी पूजना नतर पदयात्रेला श्री मुर्लिधर महाराज यांच्या नेतृत्वात प्रारंभ करण्यात आला श्री मुर्लिधर धाम कार्तिक स्वामी महाराज हनुमान मंदिर हरणघाट ( पारडी )यांच्या निमित्याने कार्तिक पर्वावर गेली अनेक वर्षापासून पालखी पदयात्रेचे आयोजन केले जाते त्या निमित्याने तालुका - जिल्हा न्हवे तर परप्रांतातील अनेक भावीक भक्त गनानी हजेरी लाऊन पालखी पदयात्रेची शोभा वाढविली हनुमान मंदिर हरनघाट ( पारडी ) मंदिरातिल सर्वेसर्वा श्री मुर्लिधर स्वामी यांच्या नेतृत्वात मंदिराची महती जिल्ह्यासः परप्राणतात पहोचली असून अनेक भाविक भक्त परप्रांततुन सावली तालुक्यातील हरनघाट ( पारडी ) येथील हनुमान मंदिरात येऊन आपल्या भावी आयुष्याची कामना करतात त्यामुळेच या वैनगंगा नदी तिरावरिल हनुमान मंदिराची महती दूरवर पसरलेली आहे त्यामुळे मंदिर परिसरात नेहमी भक्ति भावाचे वातावरण निर्माण होत असते भाविक भक्त गनांच्या समवेत मोठ्या श्रदेने पालखी पदयात्रेला प्रारंभ करन्यात आला पालखी पदयात्रेची सुरुवात हरनघाट ते घारगाव मार्कण्डा लखमापुर कुंनघाळा ते चपराळा असे प्रस्थान होणार आहे .