होड कितीची लावतेस सांग ? असे म्हणत भाऊ तू या कोंबड्याकडुन की त्या कोंबड्या कडुन.
एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील येरगाव येथील शेतशिवारात लपून छपून सुरू असलेल्या कोंबड बाजारावर मुल पोलिसांनी बुधवार दि. 9 नोहेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता धाड टाकून पाच जुगाऱ्यासह, एकूण 2 लाख 15 हजार 400 रुपये चा माल जप्त करून कार्यवाही करण्यात आली.गोपनीय माहितीवरून मुल पोलिसांनी तालुक्यातील येरगाव या गावाला लागून शेत शिवारात लपून छपून कोंबड्याची झुंज लावून त्यावर पैशाची बाजू लावून हार जीतचा खेळ चालू असताना पोलिसांनी धाड टाकून आरोपींना पकडून त्याची अंगझडती घेण्यात त्यात १) दिलीप डोनूजी निकूरे वय ५२ वर्ष रा. चिमडा ता. मुल, जि. चंद्रपूर. २) पुनेश्वर कवडू नागोसे वय ५५ वर्ष रा. चितेगाव ता. मुल जि. चंद्रपूर ३) प्रमोद हरिशचंद्र गावतूरे वय ३८ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ४) सुधीर मधूकर मुनगंटीवार वय ३२ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ५) मारोती चरणदास पिंपळे वय २५ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर ६) इश्वर पुरुषोत्तम कोठारे वय २६ वर्ष रा. हळदी ता. मुल जि. चंद्रपूर असे जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ३ जखमी कोंबडे, नगदी २७००/- रू ४ मोबाईल व ४ मोटार सायकल असा एकूण २,१५,४००/- रू चा माल जप्त करून आरोपी विरूदध गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई उपविपोअ श्री मल्लीकार्जुन इंगळे व पो नि श्री सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकते पोअं श्रावण कुत्तरमारे, शफीक शेख, संजय जुगनाके, स्वप्नील खोब्रागडे यांनी केली आहे.पुढील तपास मुल पोलिस करीत आहे.