भागडी येथील शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या.
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : भागडी येथील अल्प भूधारक शेतकरी सीताराम महादेव शेंडे वय 65 आज पहाटे चिंचोली शेतशिवारात गळफास लावून आत्महत्या केली.यांच्या मालकीचे सामूहिक गट दीड एकर असून नुकत्याच आल्येल्या पुरामुळे संपूर्ण धान पीक नष्ठ झाले. त्यांना दोन मुले व एक मुलगी असून शेतीकरिता नातेवाईककडून 35 हजार रुपये शेतीकरिता उसनवार घेतले होते. दिवाळीच्या दिवसात परत करायचे आहेत म्हणून मृतक मुलाला सांगून गेल्याचे त्याचा मोठा मुलगा प्रकाश शेंडे यांनी सांगितले.अद्याप पूर पीडिताची रक्कम खात्यात जमा न झाल्याने व उसनवार रक्कम परत करता न येऊ शकल्यानेच वडिलांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तविल्या जात आहे.