बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना – पादचारी पुल तुटल्याने प्रवासी जखमी. ★ प्रवासी रेल्वे रुळावर कोसळले - 2500 केव्ही लाईनचा प्रवाशांना धक्का.

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना – पादचारी पुल तुटल्याने प्रवासी जखमी.


★ प्रवासी रेल्वे रुळावर कोसळले - 2500 केव्ही लाईनचा प्रवाशांना धक्का.


एस.के.24 तास


बल्लारशाह : मध्य रेल्वेचे शेवटचे जंक्शन असलेले व भारतीय रेल्वेकडून आदर्श रेल्वेस्थानक असा बहुमान मिळविणाऱ्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून इतर प्लॅटफॉर्म कडे जाण्यासाठी असलेला पादचारी पुलाचा काही भाग कोसळल्याने जवळपास 8 ते 10 प्रवासी पुलावरून थेट रेल्वे रुळावर कोसळले.


हा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवसी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी पैकी सर्व प्रवासी अत्यवस्थ असल्याचे आढळुन आलें असुन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे. वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !