श्री.गुरुदेव सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी सप्ताहाचा समारोप.
★ गोंडवाना विद्यापीठ हे लोक विद्यापीठ आहे - कुलगुरू डॉ.बोकारे
एस.के.24 तास
गडचिरोली : अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथीचा समारोप काल मुख्य शाखेत संपन्न झाला. या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा होते तर सत्कारमूर्ती म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे होते. ज्येष्ठ समाजसेवी रवींद्रजी भुसारी, सेवा मंडळाचे जिल्हाप्रमुख डॉ.शिवनाथ कुंभारे,अरविंद पाटील वासेकर, पंडित पुडके ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, केशवराव देशमुख, दिलिप मेश्राम, रवींद्र वासेकर, विजय धकाते ,प्रमोद वैद्य सौ.वंदना मुनघाटे, संदीप कटकुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत अध्यासन कक्ष सुरू केल्याबद्दल कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांचा मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.बोकारे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ लोक विद्यापीठ आहे ,लोकांना हे विद्यापीठ आपले वाटावे या दृष्टीने आम्ही प्रयत्नरत आहोत. राष्ट्रसंतांनी सांगितलेला ग्रामविकासाचा विचार देण्याचे काम विद्यापीठाच्या अध्यासनाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेवी प्रा. रवींद्र भुसारी याप्रसंगी म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रसंत अध्यासन सुरू होणे हे क्रांतिकारी पाऊल असून याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, असे ते म्हणाले. डॉ. तोफा यांनी ग्रामसभा सक्षमीकरणाचे महत्त्व याप्रसंगी अधोरेखित केले. समारोपीय दिवसाची सुरुवात ध्यानपाठाने झाली. ध्यानपाठावर चिंतन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी प्रस्तुत केले . त्यानंतर रामधून काढण्यात आली. ग्रामगीता वाचन झरकर महाराज यांनी केले. दुपारच्या सत्रात गोपाल काल्याच्या महत्त्वावर प्रबोधनपर कीर्तन अमरावतीच्या स्नेहगंगाश्री शृंगारे यांनी प्रस्तुत केले. यात जनतेनी मोठा सहभाग दर्शविला.
या वार्षिक सप्ताहाची सुरुवात राष्ट्रसंतांच्या समाधीच्या पूजनाने झाली. प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे यांच्या हस्ते झाले प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. उद्घाटनाप्रसंगी प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे यांनी राष्ट्रसंतांच्या मानवतावादी विचारांचा प्रचार आणि प्रसार गावोगावी झाला पाहिजे ,यावर त्यांनी विशेष जोर दिला. दि.१३ ऑक्टोबरला रामधून काढण्यात आली. त्यानंतर श्रीगुरुदेव ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ श्री गुरुदेव सेवक केशवराव देशमुखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दुपारचे सत्रात गुरुदेव विद्यालयातर्फे पालक मेळावा घेण्यात आला. तर दि. १४ ऑक्टोबरला दुपारी ४ वाजता सर्व धर्म परिषद आयोजित करून राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या संपूर्ण सप्ताहात सामुदायिक प्रार्थनेवरील भाषणे श्री. सुखदेव वेठे, शंकर गुरनुले, चेतन ठाकरे ,अनिल धाईत, अनिल धात्रक,अमोल कनकावार आदी मान्यवरांनी प्रस्तुत केले. तर सामुदायिक ध्यानावर प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे, राजाभाऊ सोनटक्के, रामकृष्ण ताजने आदिंनी चिंतन प्रस्तुत केले. या सप्ताहात सुरेश मांडवगडे, दलित मित्र नानाजी वाढई, आत्मारामजी आंबोरकर, दामजी नैताम , मारोतराव् उईके ,घनश्याम जेंगठे, पांडुरंग घोटेकर ,मनोहर हेपट, श्रीकांत धोटे,प्रा. भास्कर नरुले , पुरुषोत्तम कुळमेथे, भास्कर उराडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमास गुरुदेव विद्यालयाचे सर्व शिक्षक वृं ,केशव सिडाम ,राजु गुरुनुले किसन् मडावी ,अतुल निपाणे , आदींचे सहकार्य लाभले.