जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांना राष्ट्रसंत साहित्य विशेषांक भेट.
राष्ट्रसंताचे ग्रामोध्दारक साहित्य गावोगावी गेले पाहिजे - प्रंचित सावकार पोरेड्डीवार
एस.के.24 तास
गडचिरोल : मानवतेचे महान पुजारी ,थोर तत्त्वचिंतक वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्व संत स्मृतीदिन गुरूकुंज आश्रम मोझरी येथे नुकताच संपन्न झाला . या कार्यक्रमात राष्ट्रसंतांच्या समग्र साहित्यावर आधारित विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले होते. देश विदेशातील मान्यवरांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.हा साहित्य विशेषांक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांना ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी दिपोत्सवाच्या प्रकाश पर्वात सस्नेह भेट दिला. प्रस्तुत विशेषांक म्हणजे राष्ट्रसंतांचा ग्राम परिवर्तनवादी विचार देणारा असून , राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार खेडोपाडी गेले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . श्री गुरुदेव मासिक विभागाच्या वतीने निर्मित ह्या अंकाचे प्रा.डॉ.दीपक पुनसे हे मुख्य संपादक असून लेख संकलन आणि संपादन कार्यात बंडोपंत बोढेकर यांनी विशेष सहकार्य दिलेले आहे.