चिचाळा येथे शेतशिवारात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या.
राजेंद्र वाढई ! एस.के.24 तास
मुल : तालुक्यातील चिचाळा येथे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मॄत शेतकऱ्याचे भैय्याजी वारलू मोहुर्ले असे नाव आहे. त्याचे वय 55 वर्षोचे होते. चिचाळा शेतशिवार परिसरात त्याची एक एकर धानाची शेती आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला.