धम्मक्रांती तुन राष्ट्रहिताची जोपासना करावी - इंजि.मंगेश मेश्राम
नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी,भंडारा
भंडारा : मौजा मानेगाव/ सडक येथे 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त स्वप्निल बनसोडे यांच्या आवाज म्यूजिकल आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन पंचशील बुद्ध विहार पंचकमिटी मानेगाव यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला होता.दीक्षाभूमीवर आल्यामुळे अनुयायांना स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा प्राप्त होते. मनात मैत्री करुणा आणि बंधुभावाचे भाव जागृत होतात. माणूस डोळस होतो. ते भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे उजेडात आपले जीवन प्रकाशमान करण्यासाठी येतात. बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या क्रांतीच्या प्रति कृतज्ञता म्हणून त्यांना नमन केले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधानाच्या माध्यमातून सन्मानाने आणि भेदभाव रहित जीवन जगण्याचा अधिकार दिला. धर्मांतर आणि नागरिकांना आपले जीवन सुखी आनंदी आणि कल्याणकारी करण्याच्या मार्ग दाखविला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बौद्धधम्म स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तीन मूलभूत सिद्धांताची शिक्षा देतो. बौद्ध धम्मात माणसामाणसातील भेद सोसत आणि विषमता थांबवू शकतो. बुद्धाची शिकवण लोकशाहीवादी असून बौद्ध धम्म दुःख मुक्तीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही समाज रचना बदलून बुद्धाच्या तत्वज्ञानानुसार सामाजिक पुनर्रचना करून नवसमाज निर्माण करावयाच्या उतारा म्हणून त्यांनी आपल्या पाच लाख अनुया्यांसोबत नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 या विजयादशमीच्या दिवशी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लाखणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिलिंदजी तायडे सर, उद्घाटक सरपंच नरेंद्रजी भांडारकर, विशेष अतिथी दिपक जनबंधू,उमेश गायधनी,प्रशांत गायधने, नितेश रोटके, अजित मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सिकंदर गोस्वामी यांनी केले.