तब्बल ६ तास आश्मी रोडवेज कंपनीतील गाड्या ठेवल्या रोखून.
★ जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे आक्रमक.
एस.के.24 तास
राजुरा : सविस्तर वृत्त असे की,राजुरा येथील आश्मी रोडवेज कंपनीतील कामगारांना केंद्रशासनाच्या निर्धारित ठरवलेल्या बदलत्या किमान रोजीप्रमाणे रोजी मिळत नसल्याने सदर कंपनी किमान रोजी कामगार कायद्याचे पालन करीत नसल्यामुळे तथा कामगारांना केंद्र शासनाकडून मिळत असलेल्या अत्यावश्यक सुविधांपासून कामगार वंचित असल्याने कंपनी बेकायदेशीरपणे नियमबाह्य पद्धतीने कामगारांकडून काम करून घेत असल्याने कामगारांची शारीरिक तथा मानसिक पिळवणूक करून कंपनी मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन सर्रासपणे करीत असल्याची तक्रार कंपनीतील कामगारांनी युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,श्री.सुरज ठाकरे यांच्याकडे केली. तक्रार करताच क्षणी कामगारांच्या या गंभीर समस्येची दखल घेत आज दिनांक:- १३/१०/२०२२ रोजी श्री. सुरज ठाकरे हे थेट कंपनीमध्ये जाऊन कामगारांच्या समक्ष कामगारांप्रती कंपनी प्रशासनाद्वारे होत असलेली बेकायदेशीर वागणूक कंपनीने तात्काळ थांबवून व कामगारांच्या हक्काच्या किमान रोजी कायद्याचे पालन करण्यास सांगितले तसेच विनाकारण बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या कामगारांना तात्काळकामावर परत घेण्यास कंपनी ला ठणकावून सांगितले. व
कंपनी प्रशासनाशी १ तास चर्चा केल्यानंतर काही मागण्या कंपनीने अंशताच मान्य केल्या व काही मागण्या पूर्ण करण्याकरिता जय भवानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, श्री. सुरज ठाकरे यांनी १ आठवड्याचा कालावधी दिला. व यापुढे कामगारांच्या प्रति होणारी बेकायदेशीर वागणूक जय भवानी कामगार संघटना खपवून घेणार नाही.!! असे सुरज ठाकरे यांनी यावेळेस कंपनीला ठणकावून सांगितले.