मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर चे वतीने बालिका दीन साजरा.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर चे वतीने   बालिका दीन साजरा.

                       

एस.के.24 तास


 मुल : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळा मधील  मूल  तालुक्यात  "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे.  याच अनुषंगाने कृषक विद्यालय सुशी,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाबगाव, आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिरोली येथे जागतिक बालिका दीन साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या दिनानिमित्त मुलींच्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्यांना उत्तेजन पर बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश -शिक्षण, खेळ, आणि समाजात मुली समोर याव्यात आणि त्यांनी नेतृत्व करावे. याच उद्देशाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले.          

  

 या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,सी.सी.आणि संदेश रामटेके शाळा सहाय्यक अधिकारी,मॅजिक बस. यांनी परिश्रम घेतले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !