भारतीय क्रांतिकारी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक यानां निवेदन.
★ विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून आदीवासी मुलीवर मारहाण करणाऱ्याना कडक कारवाई झालीच पाहिजे.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
नागभिड : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रावण दहण व आदीवासी बांधवाकडून रावण पूजण ब्रम्हपुरी तालुक्यातील भुज येथे करण्यात येते. यावेळी पुजणाच्या जवळ काही विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून बुद्धीपुरस्सर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे तिथे तणाव निर्माण झाला आणि दोन गटांत वाद निर्माण झाला. यात आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीला पकडून केस ओढून अमानुष मारहाण केली. महिलांच्या फटाक्यांने साड्या जळल्या. अशा विकृत मानसिकता असलेल्या लोकांकडून बुद्धीपुरस्सर असा प्रकार घडवून आणणाऱ्या आरोंपिना अटक करुन पोस्को कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेनी केली.
समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि बुद्धीपुरस्सर कृत्य घडवून आणणे हे निंदनीय आहे. अशा विकृत लोकांना कायदेशीर धडा शिकविणे गरजेचे आहे असे भारतीय क्रांतिकारी संघटनेचे जिल्हा महासचिव अँड. समिर चौधरी यांनी म्हटले. एका आदिवासी मुलीला पकडून केस ओढून अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई करा अन्यथा भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन करू असा इशारा पोलीस निरीक्षक यानां निवेदनाद्वारे भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा,महासचिव अजयभाऊ कोसे, जिल्हा महासचिव अँड.समिर चौधरी यानीं यावेळी दिला.
निवेदन देताना अँड.सचिन वाढवे,अक्षय उईके, दिनेश शाक्य,विनोद मडावी, गणेश हजारे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.