घाटकुळ येथे होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित. ★ युवा सप्तखंजेरीवादक उदयपाल वनीकर चे राष्ट्रीय कीर्तन १२ नोव्हेंबरला.



घाटकुळ येथे होणाऱ्या  राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे बोधचिन्ह प्रकाशित.


★ युवा सप्तखंजेरीवादक उदयपाल वनीकर चे राष्ट्रीय कीर्तन १२ नोव्हेंबरला.


एस.के.24 तास


चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे १८ वे  राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन  आदर्श गाव घाटकुळ (ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) येथे येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी होत असून  दोन दिवसीय संमेलना  संबंधीची महत्त्वाची सभा घाटकुळ येथे नुकतीच संपन्न झाली. सदर संमेलनाचे  बोधचिन्ह सुप्रसिद्ध ग्राफिक्सकार तथा कवी रामकृष्ण चनकापुरे यांनी रेखाटले असून ते प्रकाशित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत गावांसाठी ग्रामगीता लिहित आहे तर झाडीपट्टीतील ग्रामजीवन त्यांच्या तत्वप्रणालीने  उन्नत होत असल्याचा उत्तम भाव त्यातून अधोरेखित होतो. नव्या संकल्पनेतून बोधचिन्ह तयार केल्याबद्दल  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, स्वागताध्यक्ष विनोद देशमुख  यांनी ग्राफिक्सकार रामकृष्ण चनकापुरे यांचे अभिनंदन केले आहे. संमेलनाचे आयोजन सर्व ग्रामस्थ, सर्व स्थानिक मंडळ आणि श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात येत असून राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, चैतन्य युवा पुरस्कार, विशिष्ट सेवा पुरस्कार वितरण, परिसंवाद, सप्तखंजेरी युवा कीर्तनकार इंजि. उदयपाल महाराज वणीकर यांचे राष्ट्रीय कीर्तन, सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यानपाठ, निसर्गोपचार व योग प्राणायाम मार्गदर्शन, अनुभव कथन, पुस्तक प्रकाशन,कवी संमेलन आणि समारोप असे संमेलनाचे  एकंदरीत स्वरूप असणार आहे. 


संमेलनाच्या कार्यक्रमाचे अंतिम प्रारूप तयार करण्यात आले. आँनलाईन झालेल्या   परिषदेच्या सभेत स्वागताध्यक्ष विनोद देशमुख,  ऍड. राजेंद्र जेनेकर, श्रीकांत धोटे, नामदेव गेडकर, अरूण झगडकर, डॉ. श्रावण बानासुरे, संजय तिळसम्रुतकर( तेलंगण)  , विलास उगे, सुनिल नाथे, देवराव कोंडेकर, प्राचार्य पत्रे, घाटकुळ चे सरपंच सुप्रिमजी गद्देकर, पोलिस पाटील अशोक पाल, जनहित युवा संघटना चे अध्यक्ष मुकूंदाजी हासे, मराठा युवक मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल धदंरे आदी सहभागी झाले होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !