मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा.


सुरेश कन्नमवार!S.K.24 TAAS


सावली : मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व  तालुका समन्वयक कु.निकिता ठेंगणे यांच्या नियंत्रणात जि.प.उच्च. प्राथ. शाळा पारडी, खेडी, हिरापूर, बोथली,जामबूज व पेंढरी मक्ता येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. 

दर वर्षी 11 ऑक्टोंबर हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्या मागचा उद्देश म्हणजे मुलींना सक्षम करणे , त्यांच्या आवाजांना प्रोत्साहन देणे किशोरवयीन मुलींची क्षमता आणि कौशल्य ओळखून त्यांच्यासाठी अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहित करते. 



तसेच बालविवाह , शिक्षणाच्या कमी संधी, हिंसा आणि भेदभाव, यासह जगभरातील लहान मुलींना तोंड द्यावे लागणारे लिंगाधारीत आव्हाने दूर करण्यासाठी हा दिवस नियुक्त केला जातो .दर वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस थीम नुसार साजरा केला जातो . या वर्षी 2022 ची थीम आता आमची वेळ आहे - आमचे हक्क ही होती.



बालिका दिवस साजरा करण्यासाठी सर्व गावात शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.त्यात दोरिवरच्या उड्या, पोट्याटो रेस इत्यादीचा समावेश होता. यानंतर सहभागी सर्व मुलींना वैयक्तीक स्वच्छतेच्या किट बक्षीस वितरण करण्यात आल्या व विजेत्या स्पर्धकांना शैक्षणिक वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आल्या.कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख,शिक्षवृंद,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,पालकवर्ग उपस्थित होते. मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी मंगेश रामटेके, निशा उमरगुंडावार ,श्रद्धा नागमोते समुदाय समन्वयक प्रतीक तुंगीडवार,अंकिता पुल्लावार, निशा राऊत, सलोनी कातकर,सोनी शेंडे, साक्षी गंदाटे यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार  पाडला.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !