विजेच्या धक्क्याने आकस्मिक मृत्यु झालेल्या दिपक पेंदाम यांच्या कुटुंबास ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कडुन आर्थिक मदत.
"भाजपा पदाधिका-याच्या उपस्थित पेंदाम कुटुंबियास मदत सुर्पूद "
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!S.K.24 तास
सावली : पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथे महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असणारे वायरमन दीपक पेंदाम हे विद्युत दुरूस्तीचे काम करीत असतांना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने त्यांचा आकस्मिक मृत्यु झाला. त्यांच्या मागे त्यांची पत्नी व तीन व दिड वर्षीय दोन मुली आहेत व त्या दोन्ही मुली दिव्यांग आहेत. पेंदाम कुटूंबियावर आलेल्या दुख:ची माहीती क्षेत्राचे आमदार व वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना मिळताच त्यांनी शोक व्यक्त केले ,सोबतच दिपक पेंदाम यांच्या कुटुंबास आर्थिक मदत केलेली आहे. सदर मदत हि भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष व माजी प.स .सभापती पोंभुर्णा अल्का आत्राम यांच्या हस्ते सुर्पुद.करण्यात आली, यावेळी सावली तालुका भाजपा महामंत्री तथा नगरसेवक सतीश बोम्मावार, जिल्हा महिला उपाध्यक्ष तथा नगरसेविका निलम सुरमवार, माजी उपसभापति प.स पोंभुर्णा विनोद देशमुख ,नगरसेवक पोंभुर्णा दर्शन बोरंटीवार,सरपंच सचिन काटपल्लीवार,खेडी,सावली शहर.अध्यक्ष आशीष कार्लेकर,पोंभुर्णा शहर अध्यक्ष ऋषि कोटरंगे,राजु ठाकरे ,माजी सभापती प.स. विजय कोरेवार,सावली, सुरेश अल्लुरवार, ग्रा.प.स.लोकेश भडके,अनिल.माचेवार,सोमेश्वर कंचावार ,पुरुषोत्तम नरेड्डवार,नारायण कंकलवार ,नरेंद्र राचेवार आदी उपस्थित होते.
पेंदाम कुटूंबियावर.अचानक आलेल्या दुख:बद्दल ना.मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केले सोबतच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतुन ५ लाख रूपयांची मदत मिळावी अशी जी लेखी मागणी केलेली होती ती मा.मुख्यमंत्र्यांनी ताबडतोड मान्य केल्याची माहीती सुध्दा.त्यांच्या कुटुंबियास यावेळी देण्यात आली.
अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याची काळजी महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी घ्यावी असे निर्देशही ना. मुनगंटीवार यांनी यावेळी अधिका-यांना दिले, आणि पेंदाम कुटुंबियावर अचानक आलेल्या दुख:बद्दल शोक व्यक्त केले.