राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे चैतन्य युवा पुरस्कार जाहीर.
★ पुरस्काराकरिता सौ.राजुरकर,कावळे,चौधरी, तिवाडे,हासे,मुळे यांची निवड.
एस.के.24 तास
चंद्रपूर : राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्या द्वारे देण्यात येणाऱ्या चैतन्य युवा पुरस्कारासाठी खालील मान्यवरांची निवड समितीच्या द्वारे करण्यात आलेली आहे . ग्रामविकास कार्यात सक्रिय युवा वर्गासाठी चैतन्य युवा पुरस्कार दरवर्षी देण्यात येते.
त्याकरिता यावर्षी श्री.शैलेश कावळे अंतरगाव, राम चौधरी घाटकुळ,अमित तिवाडे गडचिरोली, सौ.राजश्री राजुरकर सास्ती,मुकुंदा हासे घाटकुळ, अनुराग मुळे मुडझा यांची आलेल्या प्रस्तावातून सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या मान्यवरांना घाटकुळ ता.पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथे येत्या १२ आणि १३ नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीसअँड,राजेंद्र जेणेकर आणि स्वागताध्यक्ष,विनोद देशमुख यांनी दिली.