दुर्धर आजार ग्रस्त जोडप्याचा कबिर धर्माजी निकुरे यांनी संस्थेच्या च्या मदतीने लग्न लावून दिले.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.२९ /१०/२०१२ रोजी श्री कबिर धर्माजी निकुरे अध्यक्ष ( नेटवर्क ऑफ गडचिरोली विहान बहुउद्देशीय संस्था ) च्या सहकार्याने सकाळी १२ वाजता विवाह संपन्न झाला . पद्मावती बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था शिवणी ता. जी. गडचिरोली, सचिव वनिता रतन बांबोळे यांच्या विवाह नोंदणी च्या मदतीने विवाह कार्यक्रम पार पडला नियोजित वराचे नाव श्री . सुजीत कुमार रामसिंग नाईक,मु.लोडेवाडी ता.मौशी जि . पुने बसेच वधू सौ. शर्मीला बिमल सील मु. चामोर्शी रोड पोस्ट ऑफिस च्या मागे,ता. जिल्हा. गडचिरोली यां दोघांच्या सहमताने पार पडला .
कबिर निकुरे हे संस्थेच्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात सामाजिक कार्य करीत असतात वरील विवाहच्या बाबतीत माहिती अशी आहे की सुजित नाईक यांना कुणीतरी मोबाईल नंबर दिला त्यांनी मला फोनवर विचारले की एखादी दुर्धर आजार असलेली मुलगी वधू म्हणून पाहिजे माझ्या लक्षात एक मुलगी शर्मिला नावाची होती संस्थेच्या माध्यमातून या दोघांची संस्थेने पालकत्व स्वीकारले व दोघांची भेट करवून देऊन दोघांनीही लग्नासाठी विचार केले व आज दिनांक 29/10/2022 ला त्यांचे लग्न लावून दिले. विवाह नंतर लगेच त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
विवाह प्रसंगी - कबिर धर्माजी निकुरे ,मनाली कबिर निकुरे, चांगदास मसराम , सौ आरती मसराम ,शाम मडावी , नागसेन खोब्रागडे उपस्थित होते (दोघांची नावे बदललेली आहे)