रामाळा येथे संत निरंकारी चैरीटेबल फाउंडेशन दिल्ली यांच्या तर्फे ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!S.K.24 TAAS
चामोर्शी : स्वच्छता अभियान करतांना ग्रामपंचायत सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व संत निरंकारी सेवादार व संपूर्ण साध संगत संत निरंकारी मंडळ रामाळा यांच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी पासुन येथे स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानात एकुण 20 सेवादल व 80 ते 100 निरंकारी संत महात्मे सहभागी होते.
या स्वच्छता अभियानचे उद्घाटक मा.ग्रा.पं.सरपंच अरुण भाऊ देवताळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन संत निरंकारी मंडळाचे मुखी कोंबरूजी मिडपलवार हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.तंटामुक्ती अध्यक्ष, लचमाभाऊ शिर्गावार, उपसरपंच रविभाऊ पाल, मारोतीजी उमलवार,संजय करेवार, अतुल भिरकुरवार,मोरेश्वर आभारे, रमेश कंकलवार, गुणवंत चुधरी, व सर्व साध संगत रामाळा उपस्थित होते.
ग्राम स्वच्छता अभियान मोहीम हा संत निरंकारी मंडळ रामाळा कडुन दर रविवारला गावातील संपूर्ण गल्या व मेन गेटपासुन तर जि.प. मराठी प्राथ. शाळा रामाळा पर्यंत स्वच्छतेची सेवा करण्यात येईल. हा स्वच्छता अभियान करण्यासाठी सुदर्शन मंगर,ओमदेव मलोडे, सोमाजी करेवार,चिन्नाजी करेवार,पांडुरंग जिगरवार,डोमाजी वाकडे,वासुदेव दहेलकार, भिकाजी लांबाडे,रामाजी काडीवार,मल्लाजी कंकलवार,सहदेव उईनवार,मारोती काडीवार, गौरव पाटेवार,रामदास चित्तलवार,गणेश अल्लीवार,अंकुश कंकलवार,मार्कंडी करेवार,मयुर पेंटलवार,कल्पना कंकलवार,लिलाबाई पाटेवार, मंदाबाई बंडावार,बिरुबाई कंकलवार,शितल कंकलवार,गौराबाई नस्कुलवार,निरुताबाई आमावार,अंतकला बंटूवार,रेखाबाई मिडपलवार, सुमनबाई गोपावार,मेसाबाई यारेवार,दर्शना कोरीवार,शालु मिडपलवार,लक्ष्मी कोरीवार, ललिता झरकर,भाग्यश्री कोरीवार,तन्वी कंकलवार, मोनी कंकलवार, लक्ष्मी काडीवार आदींनी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक या स्वच्छता अभियानचे सुत्रसंचालन मुकरू कोरीवार,मुकेश गोपावार,गणेश डंंकरवार,अक्षय मिडपलवार व सर्व संत निरंकारी मंडळ रामाळा या टिमने सहकार्य केले.