कळमना येथे बुधवार ला गायगोधन ढाल पुजण कार्यक्रमाचे आयोजन.
★ ४५० वर्षांची गोंड गोवारी समाजाची सांस्कृतिक परंपरा.
एस.के.24 तास
बल्लारपूर : येथून जवळच असलेल्या कळमना येथे ४५० वर्षांची परंपरा असलेली ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेली गायगोधण व ढाल पुजा येथील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या वतीने गायगोधन व ढाल पुजण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजता कार्यक्रमा ला सुरवात होणार असून यात, रॅली, मिरवणूक, परंपरेनुसार कळमना येथे ढाल पुजण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येनार आहे. यात संस्कृती, कला, इतिहास, कौशल, परंपरा, नृत्य यांचा समावेश राहणार आहे.
तरी बल्लारपूर तालुक्यातील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष कमलेश नेवारे व कळमना ग्रामस्थांनी केले आहे.