यंदाची दिवाळी गावकऱ्यांसोबत.
★ चांदापूर चे सुपुत्र पोलीस अंमलदार,रवींद्र कंकलवार यांचा एक मदतीचा उपक्रम.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!S.K.24 TAAS
मुल : भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. दिवाळी सण हा प्रत्येक सधन-गरीब वर्गातील कुटुंब आपआपल्या मर्यादेनुसार साजरा करण्याचा प्रयत्न करीत असतात.
दीपोत्सव हा अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा प्रतीक मानला जातो व आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा सण साजरा केला जातो.
पण प्रत्येक कुटुंब हे त्यांच्या आर्थिक विवंचनेमूळे कोणताही आनंदोत्सव साजरा करताना किंवा कोणत्याही सणाचा आस्वाद घेत असताना दिसून येत नही.
अशा हातास व आधुनिक युगापासून पीछाडलेल्या या समाजास प्रेमाची साद व मायेची फुंकर घालण्यासाठी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेले व चांदापूरचे सुपुत्र पोलीस अंमलदार रवींद्र कंकलवार यांनी एक मदतीचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपल्या चांदापूर व चांदापूर हेटी या गावातील 21 गरीब कुटुंबीयांना दिवाळीची भेट म्हणून फराळ व इतर साहित्य वाटप करण्यात आले. यात 1 लिटर तेल,1 किलो साखर, 1 किलो तूर डाळ,बेसन, तिखट,हळद, मीठ,पत्ती इत्यादी साहित्याचा समावेश होता.तसेच लहान मुलांना बिस्कीट ज्येष्ठ नागरिकांना धोतर वाटप करण्यात आले.
सदर साहित्य चांदापूर हेटीचे शिक्षक नंदकिशोर शेरकी व रोजगार सेवक धनराज निशाने यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले.सदर साहित्य वाटपाच्या वेळी रविंद्र कंकलवार व त्यांचे मित्र खुशाल येगावार हे उपस्थित होते.