झाडे जातीचा दर्जा देण्यात यावा.झाडे समाजातर्फे मा. रामदास आठवले साहेब सामाजिक न्याय तथा अधिकारीता मंत्री केंद्रीय मंत्रालय नवी दिल्ली यांना निवेदन
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक,16/10/2022 रविवार ला शासकीय विश्राम गृह येथे झाडे समाजातर्फे मा. रामदास आठवले साहेब सामाजिक न्याय तथा अधिकारी ता राज्यमंत्री केंद्रीय मंत्रालय नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये झाडे समाजातील स्वातंत्र्यानंतर 75 वर्षापासून झाडे,झाड्या,झाडे कुणबी,झाड्या कुणबी,झाडे कापेवार,अशा नोंदणी असलेल्या समूह झाडेच असून हा समाज हजारो वर्षापासून राहत असून त्यावर झालेल्या अन्यायाबाबत गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्यानंतर 75 वर्षापासून वास्तव्य करीत असलेली झाडे ही जात किंवा शासनाच्या धोरणानुसार एन.टी.सी. ह्या वर्गवारीचे प्रमाणपत्र दिल्या जात होते.
सध्याच्या शासकीय धोरणानुसार राज्यस्व रेकॉर्डमध्ये झाडे,झाड्या,झाडे कुणबी,झाड्या कुणबी,झाडे कापेवार, अशी नोंद असून झाडे या जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून तात्पुरता प्रदान केली जात आहे.
परंतु झाडे समाजाच्या पुढील जात वैद्यता प्रमाणपत्र हे कोणत्याही प्रमाणपत्रावर मिळत नाही. या समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये व शासकीय नोकरीचा दर्जा मिळत नाही झाडे या नावाची जात प्रमाणपत्र कायम ठेवण्यात येऊन ही जात एन. टी.सी. या वर्गवारी मध्ये पूर्वीप्रमाणे लागू करण्यात यावी अशी मागणी झाडे समाजातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना, गजानन तुंकलवार (झाडे समाज युवा कार्यकर्ते),मारकबोडी, दीपक वेडंगवार,(झाडे समाज युवा कार्यकर्ते),मारकबोडी,आशिष बर्लावार,(झाडे समाज युवा कार्यकर्ते) ,मारकबोडी,निकेश तुंकलवार,(झाडे समाज युवा कार्यकर्ते),राखी टोली रुपेश चुधरी मा.उपसरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य,मारकबोडी मा,पंडितराव मेश्राम (पो.पा.)मारकबोडी,मा.लाडे साहेब,गडचिरोली, मा. गोवर्धन साहेब गडचिरोली,मा.अरुण भाऊ शेंडे,गडचिरोली मा. हेमंत पा.मेश्राम गडचिरोली