शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)विदर्भ प्रमुख राजुभाऊ देशमुख यांचे मा.जिल्हाधिकारी साहेब, गडचिरोली यांना निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : घरकाम कामगार व बांधकाम कामगार यांना घरकुल,राशन कार्ड व अतिवृष्टीमुळे पडझळ झालेल्या घराची चौकशी करून आर्थिक लाभ देण्याबाबत.
उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास नम्र विनंती करीत आहे की , गडचिरोली नगर परिषद गडचिरोलो अंतर्गत येणाऱ्या घरकाम कामगार , बांधकाम कामगार या आर्थिक दृष्ट्या कमकुवत लोकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात.परंतू या अंगणमेहनतीने जीवन जगणाऱ्या लोकांना आजही शासनाच्या घरकुल, राशनकार्ड व अतिवृष्टीमुळे झळ झालेल्या घरांची चौकशी करणे व त्यांना लवकरात लवकर लाभ मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे . मी राजू देशमुख , अध्यक्ष शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक संघटना व जनरल कामगार सेना महासंघ या नात्याने विविध समस्या निर्मूलन करण्याच्या दृष्टीने मागण्यांचे निवेदन सादर करीत आहे . मागण्या :
१ ) घरकुलाचे निकष डावलून घरकुल बाटण्यात आले आहे अशा लोकांची अधिकान्यासहीत सखोल चौकशी करणे अतिगरजू लोकांना सावधानानुसार निवाऱ्याची घराची व्यवस्था करून देणे .
२ ) शहरातील वाटण्यात आलेल्या व नगर परिषद अंतर्गत बांधलेल्या घरकुलाच्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करणे .
३) गरीब व गरजू लाभार्थ्यांना राशनकार्ड देण्याची व्यवस्था करावी .
४) अतिवृष्टीने पडझळ झालेल्या लोकांच्या घराची चौकशी करून त्यांना आर्थिक लाभ देण्यात यावा ..
वरील मागण्या सन्माननिय जिल्हाधिकारी साहेब गडचिरोली यांनी लवकरात लवकर अधिका - यांना आदेश देऊन दिवाळीपूर्वी निकाली काढावे वरील मागण्या दिवाळीपूर्वी मंजूर न झाल्यास मी व माझे सहकारी , पदाधिकारी , विदर्भ संपर्क प्रमुख कबिर धर्माजी निकुरे ,जिल्हाप्रमुख देवराव जी . दुधबळे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यायी हि विनंती .
निवेदन देतांना विदर्भ अध्यक्ष राजुभाऊ देशमुख, विदर्भ संपर्क प्रमुख कबिर यशोदा धर्माजी निकुरे,गडचिरोली जिल्हा अध्यक्ष देवराव दुधबडे,गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम,गडचिरोली शहर प्रमुख राजू पेदापल्ली, महिला गडचिरोली जिल्हा अध्यक्ष दीपिका भानारकर, महिला गडचिरोली जिल्हा सचिव भावना जोगी, गोकुलनगर शाखा प्रमुख जोसना बावणे, विवेकानंद नगर शाखा उपप्रमुख कमल टेंभुरणे,अभय वानखेडे,कमल आत्राम,अल्का भोयर,प्रतिभा रामटेके, वंदना बलुगवार,निर्मला कोरेवार,जिजाबाई खोब्रागडे ,दीक्षा खोब्रागडे,मंदा गेडाम,प्रेमीला बांबोळे,संगीता रामटेके,राहुल पुरी,सचिन गेडाम,चेतन धुर्वे,अविनाश गेडाम, मनोज मेश्राम,अनुप सरकार,बहुसंख्येने पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.