हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.

हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा.


एस.के.24 तास


गडचिरोली : मागण्या : -  ग्राम विकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद मधील आरोग्य विभागाची 5 संवर्गातील पदभरती त्वरीत होण्याबाबत व आरोग्य विभागाची दि. 29/09/2021 ची नवीन सेवाप्रवेश नियम अधिसुचना तात्काळ रद्द करण्याची मागण्या घेऊन.


  सन 2019 मध्ये ग्रामविकास विभागातील जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या ५ संवर्गातील परिक्षांच्या पदभरती करण्यासाठी जाहीरात काढली होती. परंतु ग्रामविकास विभाग विविध कारणे देऊन ही पदभरती पुढे ढकलत आहे. या महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला देखिल ग्रामविकास विभागाने वेळापत्रक जाहीर केले परंतू आता देखील MPSC च्या परीक्षांचा हवाला देऊन हे वेळापत्रक देखील रद्द केले. एखाद्या कोर्टाच्या केसेस प्रमाने तारखांवर तारखा देत आहेत परंतू परीक्षा घेण्याचा मुहूर्त मात्र ग्रामविकास विभागाला मिळत नाही आहे. आता तर काही वर्तमान पत्रामध्ये ही पदभरती रद्द करुन नव्याने पदभरती घेण्यात येणार असल्याचे वृत्त प्रकाशीत झाले आहे. असे झाल्यास 29/09/2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने जी नवीन सेवाप्रवेश नियम अधिसुचना काढली ती लागु केली नाही. यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाकरीता पात्रता म्हणुन उमेदवार हा 12 वी (विज्ञान) शाखेतुन उत्तीर्ण व स्वच्छता निरिक्षक हा कोर्स अनिवार्य केला आहे. या पदभरतीमध्ये हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना 50% जागा ह्या राखीव ठेवल्या होत्या. शासनाच्या नियमाप्रमाणे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांना बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदामध्ये 50% जागा राखीव असतात. 2019 जाहीरातीमध्ये उमेदवार हे 10 वी पास असावा अशी शैक्षणिक पात्रता होती. व हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन काम केल्याचा 90 दिवसाचा अनुभव असावा ही अट होती. परंतु 2019 पासुन शासनाने ही पदभरती विविध कारणे देऊन पुढे ढकलत आहेत. आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात 1995 पासुन मलेरीया नियंत्रणात आणण्यासाठी वर्षानुवर्षे तटपुंज्या मानधनावर सेवा देत आहोत. आम्ही सर्व 10 वा वर्ग उत्तीर्ण असुन आमच्या साठी 50% कोटा हा राखीव असतो. शासनाने नवीन पदभरती करतांना जर नवीन सेवाप्रवेश नियम लागु केला तर 2019 मध्ये अर्ज भरलेले आम्ही सर्व उमेदवार अपात्र ठरु, इतकेच नाही तर बऱ्याचशे उमेदवार हे आपली वयोमर्यादा पार करुन जातील. आम्हा सर्व हंगामी क्षेत्र कर्मचा-यांवर हे अन्यायकारक होत असुन करीता सदरील परिक्षा 2019 च्या जाहीरातीप्रमाणेच घेण्यात याव्या. 


तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 29/09/2021 रोजी काढलेली नवीन सेवाप्रवेश नियम अधिसुचना तात्काळ रद्द करावी ही अधिसुचना रद्द केली नाही तर आम्ही हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन अतिदुर्गम भागात सेवा देणे उचित नाही. नवीन सेवाप्रवेश नियम लागु करतांना हंगामी क्षेत्र कर्मचारी यांचा कुठलाही विचार केला नाही. यामुळे इतक्या वर्षापासुन सेवा देणारे हंगामी क्षेत्र कर्मचारी पुर्णतः निराश झाले आहेत. हे सेवा प्रवेश नियम तात्काळ रद्द करण्यात यावे. करीता वारंवार आम्ही सविधानिक मार्गाने आंदोलन देखील केले आहे. मागील उन्हाळी अधिवेशनात आम्ही आझाद मैदानवर याकरीता उपोषण देखील केले आहे. तत्कालीन आरोग्य मंत्र्यांनी या अधिसुचनेवर तात्काळ विचार करण्यात येईल अशी ग्वाही सुध्दा दिली होती. परंतु अद्याप यावर कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. करीता ही अधिसुचना तात्काळ रद्द करण्यात यावी. राज्य शासनाने 2019 मध्ये राज्य स्तरावरील आरोग्य विभागातील पदभरतीमध्ये सुध्दा उमेदवारांवर खुप मोठा अन्याय केला, यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदाची परिक्षा घेवुन फक्त 50% जागा भरल्या उर्वरीत 50% जागा अजुनही भरल्या गेल्या नाही.. त्या रिक्त जागा त्याच परिक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवारांमधुन त्वरीत भरण्यात यावे…


ईत्यादी मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.


सदरील मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानदीप गलबले, उपाध्यक्ष लालास धोरे,सचिव अमित कुकुकार, कोषाध्यक्ष प्रशिक म्हशाखेत्री, सल्लागार सुनिल तागडे, प्रसिद्धी प्रमुख सोपान म्हशाखेत्री उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !