झाडीबोली साहित्य मंडळाचा वर्धापन दिन काव्यमैफिलीने साजरा.
गडचिरोली (प्रतिनिधी)-
झाडीबोली चळवळीचे संस्थापक , संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या ७८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने डॉ.लेनगुरे भवनात काव्य मैफिलचे आयोजन केलेले होते.या मैफिलीत गडचिरोलीतील सुप्रसिद्ध १२ कवींनी आपली हजेरी लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अॅड. संजय ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीचे समन्वयक तथा साहित्यिक बंडोपंत बोढेकर उपस्थित होते. या मैफिलीत एकापेक्षा एक सरस गझला व कविता रसिकांना ऐकायला मिळाल्यात. अॅड.ठाकरे यांनी झाडीबोली साहित्य मंडळ हे कवींचे हक्काचे व्यासपीठ असून याचा फायदा गडचिरोलीतील नवोदित साहित्यिकांनी जास्तीत जास्त घेण्याचे आवाहन केले. श्री. बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी उभ्या केलेल्या झाडीबोली चळवळीचे महत्व विषद करून डॉ. बोरकर यांना मंडळातर्फे शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात
आल्या.कविसंमेलनाचे सुत्रसंचालन मारोती आरेवार यांनी केले तर उपस्थित कवींचे आभार संजीव बोरकर यांनी मानले. या मैफिलीत संजय ठाकरे यांनी "माझा काळीज तो गेला ,झेप आकाशी घेतला " अशा भावना कवितेतून व्यक्त केल्यात तर "निर्वाणीचे बोलू नको तू ,
कर जगण्यावर प्रीत तू " या कवितेतून जगण्याचे रहस्य ज्येष्ठ कवी विनायक धानोरकर यांनी उलगडले.
"माझ्या कवेत यावी,ती रात्र थांबलेली,संपू नये कधीही ही रात्र थांबलेली " या डॉ. प्रविण किलनाके यांच्या रचनेच्या सादरीकरणास मैफिलीची उत्स्फूर्त दाद मिळाली.
गावाचे वर्णन करणारी रचना "गाव राहिले तसेच माझे,शहर चकाचक झाले
विकास झाला विकास झाला सांगत गेले मुद्ये" मारोती आरेवार यांनी सादर केली तर "मला सोडून जाणाऱ्या ,तुझ्या श्वासात आहे " या संजिव बोरकरांची कविता भाव खाऊन गेली.
"माझ्या मनालाही देत चला खांदा,
माझ्या खांद्यालाही देत चला खांदा " युवा कवी अमोल मेश्राम यांनी आपली रचना प्रभावीपणे सादर केली तर
ज्येष्ठ कवी उपेंद्र रोहणकर यांनी "आता उतार वय ,केस काळ्याचे पांढरे
तरी शोधतो मी त्यात तारूण्याचे झरे" या कवितेने हास्यारंग उधळला गेला.
कमलेश झाडे यांनी"वाद दोघातले टाळले पाहिजे,
भूत मनातले गाडले पाहिजे" ही वैचारिक कविता सादर केली तर डॉ चंद्रकांत लेनगुरे यांच्या
"दिसभर डसली तरी,रातीस पिरमात ओढते
खुप आहे जादू तिच्यात, बायकोचं मालं भावते" यांच्या या उत्तम झाडीबोली कवितेने मैफिलीचा समारोप करण्यात आला. याच सभेत मंडळाची मासिक सभा घेण्यात आली. आणि त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
एस.के.24 तास
गडचिरोली : झाडीबोली चळवळीचे संस्थापक , संशोधन महर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या ७८ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने डॉ.लेनगुरे भवनात काव्य मैफिलचे आयोजन केलेले होते.या मैफिलीत गडचिरोलीतील सुप्रसिद्ध १२ कवींनी आपली हजेरी लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अॅड. संजय ठाकरे तर प्रमुख अतिथी म्हणून झाडीबोलीचे समन्वयक तथा साहित्यिक बंडोपंत बोढेकर उपस्थित होते. या मैफिलीत एकापेक्षा एक सरस गझला व कविता रसिकांना ऐकायला मिळाल्यात. अॅड.ठाकरे यांनी झाडीबोली साहित्य मंडळ हे कवींचे हक्काचे व्यासपीठ असून याचा फायदा गडचिरोलीतील नवोदित साहित्यिकांनी जास्तीत जास्त घेण्याचे आवाहन केले. श्री. बोढेकर यांनी डॉ. हरिश्चंद्र बोरकरांनी उभ्या केलेल्या झाडीबोली चळवळीचे महत्व विषद करून डॉ. बोरकर यांना मंडळातर्फे शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात