मॅजिक बस इंडिया फाउंडेशन अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कडोली येथे ११आक्टोबंर जागतिक बालिका दीन साजरा करण्यात आला.
एस.के.24 तास
चंद्रपूर : आज ११ ऑक्टोंबर या दिवशी जगात बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कारण मुलींना येणाऱ्या अडचणी, समस्या,अधिकार ,संरक्षण या विषयी मुलींना जागृत करणे खूप गरजेचं आहे हेच उद्देश ठेवून ZPUP कढोली या शाळेतील मुलींना त्यांचे अडचणी, समस्या,अधीकार यावर आधारित स्पर्धात्मक खेळ घेऊन मार्गदर्शन करण्यात आले व स्पर्धेत सहभागी मुलींचे विशेष बक्षीस देवून त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. कार्यक्रमात जागतिक बालिका दिन यावर आधारित भाषण स्पर्धा ठेवण्यात आले त्यात बऱ्याच मुलींनी सहभाग दर्शवून मुलींचे अधीकार व समानता यावर भर दिलेत तसेच उपस्थित असणारे प्रमुख अतिथी व पालक वर्ग यांनी देखील या कार्यक्रमा प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात गावचे पोलिस पाटील सौ. सवीताताई लांडे. तं.मु अध्यक्ष श्नी. रामदास कुरसंगे अंगणवाडी सेविका लीलाबाई पोहणकर. गावचे आशा वर्कर ललीताताई बोढे . शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ललीताई. आणि कवीता ताजने. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लोभा जीवने,पाल सर ,खैरे सर, दुर्गे सर,बारेकर उपस्थित होते.