व्यसन ही समाजाला लागलेली कीड - माजी पं. स.सभापती,मारोतराव इचोडकर यांचे प्रतिपादन.
सुरेश कन्नमवार !मुख्य संपादक!एस.के.24 तास
गडचिरोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने दि. १ ते ८ ऑक्टोबर पर्यंत व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.या सप्ताहाचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर यांचे हस्ते झाले.
प्रास्ताविक नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार यांनी केले.या प्रसंगी मारोतराव इचोडकर म्हणाले,व्यसन ही समाजाला लागलेली फार मोठी कीड असून प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे गावात स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे. महात्मा गांधींचा विचार आपल्या जीवनात उतरविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सरपंच पुण्यवान सोरते यांनी व्यसनमुक्तीचे विचार सांगत ग्रामपंचायतीच्या एकंदरीत कार्यावर प्रकाश टाकला . सूत्रसंचालन संगणवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. संगीता भडके यांनी केले.याप्रसंगी अनेकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला आणि व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी श्रीगुरुदेव उच्च प्राथमिक विद्यालयातत गडचिरोली येथे गांधी जयंतीच्या निमित्ताने सर्वधर्म प्रार्थना व व्यसनविरोधी शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचे तिसऱ्या दिवशी व्यसनविरोधी युवकांची कार्यशाळा व पोस्टर पद्धतीने चे आयोजन शिवाजी महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते.तंबाखू व मद्यपानांमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.जे. मेश्राम होते . प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर,कवी श्रीकांत धोटे,जिल्हा सामान्य रुग्णालयाचे दिनेश खोरगडे, रामनगर गुरुदेव सेवा मंडळाचे सुरेश मांडवगडे लाभले होते.
महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सभागृहामध्ये आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा.डॉ.खोडे यांनी केले तर नशाबंदी मंडळाच्या कार्यावर जिल्हा संघटक,संदीप कटकुरवार यांनी प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्राचार्य मेश्राम म्हणाले की युवा वर्गाने स्वतःला जपले पाहिजे.शरीर हेआपले मंदिर असून त्यास मंदिरासारखे पवित्र ठेवण्याचे काम आपण केले पाहिजे. याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवी श्रीकांत धोटे, समुदेशक दिनेश खोरगडे ,सुरेश मांडवगडे यांनी समायोजित विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी केले . आभार प्रा. डॉ. राजेंद्र गौर यांनी केले.