13 ऑक्टोंबर रोजी नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन.

13 ऑक्टोंबर रोजी नाविन्यपुर्ण कल्पना व उद्योग सादरीकरणासाठी बुट कॅम्पचे आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : जिल्हयातील  नागरीकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी तसेच राज्यातील उद्योजकता व नाविन्यपुर्ण  परिसंस्था बळकट करण्यासाठी विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यांत येत आहे.आपल्या नेतृत्वाखाली प्रचार  व प्रबोधनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पाडला असून यात्रेच्या  दूस-या टप्यात दिनांक.13 ऑक्टोंबर 2022 रोजी नव संशोधन केंद्र,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे सकाळी 9.30 वा. एकदिवसीय सादरीकरण सत्र व जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यांत येत आहे.


 स्टार्टअप यात्रेकरीता www.mahastartupyatra.in या लिंकवर ऑनलाईन अर्ज सादर करावे तसेच ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली नसेल अशा उमेदवारांनी सुध्दा व्यक्तीश: नव संशोधन केंद्र, गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे उपस्थित राहावे. वयाची अट नसल्याने जिल्हयातील जास्तीत जास्त नवउद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्थांनी सहभागी होण्याकरीता जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरणाचे सत्राचे मुख्य टप्यामध्ये प्रास्ताविक व विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती, स्थानिक स्टार्टअप / उद्योजकाची व्याख्याने ,स्टार्टअप व नवउद्योजकता कार्यशाळेचे विषय, सादरीकरण सत्र व मुल्यमांकन तसेच जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा करण्यांत येणार आहे.


या प्रशिक्षण शिबिराचे प्रथम व व्दितीय असे दोन सत्र करण्यांत आले असून सकाळी 9.30 ते सकाळी 11.30  वाजेपर्यंत विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती ,स्टार्टअपचा प्रवास तसेच स्थानिक उद्योजकाची व्याख्याने आयोजित करण्यांत येणार आहे.  तर दुसऱ्या सत्रात दूपारी 12.45 नवउद्योजकांना साधरीकरणाची संधी देण्यांत येईल प्रत्येक सहभागीस 10 मिनीटे सादरीकरणासाठी संधी मिळेल यामध्ये 5 मिनीट सादरीकरण व 5 मिनीट प्रश्नोत्तराची असेल जिल्हास्तरावरील विजेत्यांची निवड कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती व्दारे केली जाईल.  


जिल्हास्तरावर उत्कृष्ट सादरीकरण करणा-या प्रथम तीन उमेदवारांना प्रथम 25 हजार, व्दितीय 15 हजार तर तृतीय 10 हजार याप्रमाणे पारितोषिक दिल्या जाईल अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,शासकीय संकुल बॅरेक क्रमांक 2,युनिट क्रं-2,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे 07132-222368 या दूरध्वनी क्रमांकारव संपर्क साधावा असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे नव संशोधन केंद्राचे संचालक, मनिष उत्तरवार व  जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !