कार-दुचाकीच्या भिषण अपघातात दोन गंभीर जखमी ★ अड्याळ-दिघोरी राज्यमार्गावरील घटना.

कार-दुचाकीच्या भिषण अपघातात दोन गंभीर जखमी


★ अड्याळ-दिघोरी राज्यमार्गावरील घटना.


एस.के.24 तास जिल्हा प्रतिनिधी : नरेंद्र मेश्राम


भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अड्याळ-दिघोरी राज्य मार्ग क्रमांक ३५८ वरील खराशी गावाबाहेर भिवराबाई गोशाळे जवळ भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जख्मी झाले. हा दुर्दैवी अपघात गुरुवारी (दि.८सप्टेंबर)

सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडला.


गणेश दादाजी मानकर (वय ३२)स्वप्निल पुंडलिक नाईक (वय ३०) दोघेही राहणार पारडी (मूर्झा) ता. लाखांदूर अशी जखमींची नावे आहेत.


हा अपघात इतका भिषण होता की या भीषण अपघातात कारचा दर्शनीय भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून दुचाकी पूर्णतः नेस्तनाबूत झाली आहे. अपघात घडल्यावर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती.


लाखांदूर तालुक्याच्या दिघोरी (मोठी)  येथून एम. एच.३१ सी.आर.९६६८ क्रमांकाची प्रभू हुमे राह.गुरढा ता.लाखनी यांच्या मालकीची चार चाकी पालांदूर च्या दिशेने येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या विना क्रमांकाच्या भरधाव दुचाकीला कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार अनियंत्रित होऊन हा अपघात घडल्याचे वृत्त आहे.


 या अपघातात जख्मी झालेल्यांना १०८ रुग्णवाहिका बोलवून स्थानिक पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून भंडारा येथील सामान्य रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ रवाना करण्यात आले. जखमी पैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.


अपघाताची माहिती मिळताच खराशी येथील नागरिकांनी घटनास्थळ गाठले. नागरिकांनी मदत कार्य केले. याची माहिती पालांदूर पोलिसांना मिळताच वृत्त लिहिस्तोवर ठाणेदार वीरसेन चहांदे,पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तलमले,पोलीस शिपाई नावेद पठाण,मलोडे,अंडेल,यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !