जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी सन 2022 ते सन 2024 करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा हिरापूर येथील शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली .शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पुन्हा माननीय श्रीमान,संदीपजी माधव सायत्रावार यांची अविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी सौ.कविताताई अशोक नागापुरे यांची सुद्धा अविरोध निवड झाली.
शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून सौ.प्रियंका सुनील कन्नाके,सौ. मीनाक्षी मंगेश भोपये,श्रीमान रणजीत देविदास कन्नाके ,सौ. शुभांगी सचिन कलमुलवार, श्रीमान राहुल भास्कर भोयर, श्रीमान किशोर मंगलदास कोरडे, श्रीमान प्रमोद नामदेव जुनघरे, आणि सौ सावित्रीताई प्रदीप कोरडे यांची निवड झाली.
येथील शाळा व्यवस्थापन समितीची निवडणूक ही अगदी शांततेत पार पडली.या प्रसंगी निवडणुकीची पार्श्वभूमी आणि पदाधिकाऱ्यांची शाळा व्यवस्थापन समितीतील अधिकार आणि कर्तव्ये याविषयी आदरणीय कु.गीता मोहूर्ले मॅडम मुख्याध्यापक,यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.शाळा व्यवस्थापन समिती निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी श्री,माणिक पाटेवार सर आणि श्री, किशोर लाडे सर ज्येष्ठ शिक्षक यांनी उत्तम रित्या पार पाडली.तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीसाठी श्री,गुरुदास शिडाम सर विज्ञान विषय शिक्षक,श्री रवींद्र उईके सर तंत्रस्नेही शिक्षक तसेच कु.भावना इंदुरकर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.