श्रावण बाळ योजनेचे पैसे सात महिन्यापासून मिळाले नाही ते लवकर द्या
★ वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार.
एस.के.24 तास भंडारा प्रतिनिधी : नरेंद्र मेश्राम
भंडारा : श्रावणबाळ योजने चे पैसे ज्यांचा कोणी करता धरता नसून त्याला एक हजार रुपये महिना सरकार देत असते परंतु गेल्या सात महिन्यापासून धर्मापुरी, कुंभली , सावरबद, बोंडे, खंडाळा, येथील शेतकरी सेवाकेंद्र कुंभली येथे श्रावण बाळ योजनेचे पैसे आले का म्हणून वारंवार हातात काठी घेऊन जातात दर महिन्याला चक्कर मारतात परंतु अजून पर्यंत पैसे आले नाही त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.
महागाई वाढलेली आहे भरपूर वस्तूचे भाव वाढलेले आहेत अशी अवस्थेत हजार रुपये मिळणारी तुटपुंजी परवडत नाही तरीपण सुद्धा तेवढेही हजार रुपये सरकारला द्यायला अडचण होत आहे इतर काम करायला सरकारकडे भरपूर पैसे आहेत परंतु गोरगरीब वंचित अशा गरीब, संजय गांधी निराधार योजना, अपंग योजना ,असे विविध योजनेचे पैसे अजून पर्यंत आले नाही अशी लोकांची ओरड आहे विशेष करून कुंभली धर्मापुरी ,सावरबंद, येथील श्रावण बाळ योजनेचे कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यादोराव गणवीर यांनी भेट दिली व त्यांचे समस्या जाणून घेतल्या व त्यांना आश्वासन दिले की जर पैसे आले नाहीत तर आम्ही तहसीलदार आम्हाला मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही निवेदन देऊ असे आश्वासन दिले व समस्या जाणून घेतल्या.
एक ते दोन महिने अगोदर वंचित बहुजन आघाडी शाखा साकोलीने श्रावण बाळ ,अपंग योजना ,व इतर योजनांचे गरीबांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजे म्हणून तहसीलदारामार्फत कलेक्टरला निवेदन दिले होते तरीपण सुद्धा अजून पर्यंत पैसे आलेली नाही अशी ओरड म्हाताऱ्या लोकांची आहे आमचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यादवराव गणवीर यांनी कुंभली येथील म्हाताऱ्या लोकांची संपर्क साधला व प्रत्येक्षात भेट घेतली असता त्यांनी सांगितले की गेल्या सात महिन्यापासून पैसे मिळाले नाही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व जर पैसे आले नाही तर आम्ही पुन्हा कलेक्टरला निवेदन देऊ असे आश्वासन दिले या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी व वंचित बहुजन आघाडीचे यादवराव गणवीर ,अमित नागदेवें,यांनी भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जर पैसे आले नाही तर पुन्हा आम्ही तुमच्या समस्या करता कलेक्टर ला बाळ योजनेचे लाभार्थी व म्हातारे लोक यांना आश्वासन दिले.