ठाकरे आणि शिंदे गटात हाणामारी.
एस.के.24 तास
बुलडाणा : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटातील वाद चिघळला आहे. याचे पडसाद बुलढाण्यात जाहीर कार्यक्रमात उमटले. बुलढाण्यात एका जाहीर कार्यक्रमात ठाकरे आणि शिंदे गटाचे समर्थक आपापसात भिडले. दोन्ही गटात हाणामारी झाली.
ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि उपनेते लक्ष्मण वडले यांना मारहाण केली, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
तर शिवसेनेचे संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर म्हणाले की, “हल्ला करणाऱ्यामंध्ये सर्वात पुढे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी होते. ”
घटनेचे गांभीर्य पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी प्रत्यक्ष बुलढाणा बाजार समितीमधील सभागृहात भेट देऊन पाहणी केली. ते सध्या या घटनेचा तपास करत आहेत.