आर.एस.एस.च्या अभ्यासिकेत गोळीबार ; एकाचा मृत्यू.
एस.के.24 तास
भंडारा : भंडाऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अभ्यासिकेत आज संध्याकाळच्या सुमारास अचानक झालेल्या गोळीबार झाला.या घटनेत एका युवकाचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
अतुल वंजारी (28 रा. गणेशपूर ता. भंडारा) असे मृताचे नाव आहे. तर, गंगाधर निखारे (40, रा. पवनी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
भंडारा पोलिस स्टेशन परिसरात हेडगेवार चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इमारत आहे. या इमारतीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्व.अण्णाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालय आणि अभ्यासिका केंद्र आहे. या वाचनालयात अचानकपणे चार वाजता गोळीबार झाला.
अतिरक्तस्त्रावामुळे जखमी अतुलचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक रोहित मतानी,अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील आदी घटनास्थळी पोहोचले.