जांभळी /खांबा येथे वंचित बहुजन आघाडीची सदस्य मोहीम अभियान.

जांभळी /खांबा येथे वंचित बहुजन आघाडीची सदस्य मोहीम अभियान.

           

एस.के.24 तास प्रतिनिधी : नरेंद्र मेश्राम


भंडारा : साकोली जवळ असलेल्या जांभळी  खांबा येथे रुपेश तागडे यांच्या निवासस्थानी  वंचित बहुजन आघाडीची सदस्य मोहीम अभियान राबवण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या सामाजिक कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे  जिल्हा संघटक डी जी  रंगारी व अमित नागदेवे उपस्थित होते डी जी रंगारी यांनी वंचित बहुजन आघाडी ही  फुले, शाहू ,आंबेडकर विचारधारेवर चालणारे सामाजिक संघटन असून राजकीय पार्टी सुद्धा आहे जे वंचित घटक आहेत समाजामध्ये त्या सर्व वंचित घटकांना एसटी, एसटी, ओबीसींना सोबत घेऊन त्यांना न्याय हक्कासाठी लढणारी ही पार्टी असून समाजात एक प्रकारचा समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी कटिबद्ध आहे व वंचित घटकांना  सत्तेत बसविण्यात ,वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा एड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करणारी ही एक चळवळ ,संघटन आहे आणि या चळवळीत  सर्वांनी सहभागी झाले पाहिजे असे मत डी जी रंगारी यांनी व्यक्त केले तसेच अमित नागदेवे यांनी सुद्धा वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी धावपळ करत आहे सत्ताधारी बनवण्यामध्ये त्यांच्यासाठी कटिबद्ध आहे सर्व वंचित घटकांना सामावून घेणारी ही एकमेव पार्टी आहे या पार्टी सर्वांनी जुळावे न्याय मिळवून घ्यावा असे मत अमित नागदेवे यांनी केले व सर्व कार्यकर्त्यांचे प्रवेश फॉर्म भरून घेण्यात आले त्यामध्ये आकाश कांबळे,शुभम  लेदारे ,जितेंद्र  पंधरे,मोरेश्वर डोंगरे, सुरेश कुंभरे ,ओमप्रकाश कोसरे ,राजू पंधरे ,जितेंद्र कोसरे, सचिन मेश्राम, प्रमोद गणवीर ,पुरुषोत्तम ईलमकार व इतर कार्यकर्त्या प्रसंगी उपस्थित होते मान्यवरण मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले याप्रसंगी रुपेश तागडे  यांनी आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !