गोंदिया -वडसा,वडसा-चांदापोर्ट,चांदापोर्ट-गोंदिया रेल्वे धावणार 1 आँक्टोंबर पासून.
एस.के.24 तास
गोंदिया : दक्षिण पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत येत असलेल्या नागपूर झोन अतंर्गत गोंदिया-वडसा-चांदापोर्ट मार्गावर कोरोना काळाआधी सुरु असलेल्या मात्र नंतर बद असलेल्या पॅसेंजर रेल्वेगाड्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलेला आहे.दक्षिण पूर्व मध्य रेलवे बिलासपूरचे उपायुक्त(गुडस)अवधेश त्रिवेदी यांनी आज 21 सप्टेंबरला या संदर्भातील पत्र जारी केले आहे.त्यानुसार गोंदिया-वडसा स्पेशल पॅसेंजरी ही रेल्वे गाडी 30 सप्टेंबरला गोंदिया रेल्वेस्थानकावरुन सायकांळी 7 वाजता(19.00 पीएम)ला सुटणार तर वडसा येथे रात्रीला 9.30 वा पोचणार आहे.तर वडसा चांदापोर्ट ही रेल्वेगाडी वडसा रेल्वेस्थानकावरुन सकाळी 7.15 वाजता सुटेल व चांदापोर्टला 9.55 ला पोचेल.तर चांदापोर्ट-गोंदिया ही रेल्वेगाडी 1 आँक्टोंबरपासून चांदापोर्ट रेलवे स्थानकावरुन सकाळी 10.20 वाजता सुटणार असून गोंदियाला सायकांळी 4 वाजता पोचणार आहे.