नवभारत विद्यालय व कनिष्ट महा.येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक़म संपन्न.

नवभारत विद्यालय व कनिष्ट महा.येथे स्वातंत्र्याच्या अमृत होत्सवानिमित्त विविध स्पर्धा व उपक़म  संपन्न.


एस.के.24 तास


मूल : नवभारत विद्यालय तथा  कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, मुल येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा व ध्वजारोहण करण्यात आले.दिनांक  9 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली . या स्पर्धेत एकूण दहा विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणय लेणगुरे व प्रेम शेंडे - किती किती छान माझे तिरंगी निशाण, द्वितीय प्रणाली हेटकर व संच- ए वतन आबाद रहे तू, तृतीय साक्षी मेश्राम व रितिका मेश्राम - ए वतन मेरे आबाद रहे तू यांचा आला.परीक्षक म्हणून श्री निखारे सर, उमक मॅडम, उरकुडे सर यांनी काम पाहिले.दिनांक 10 ऑगस्ट रोजी ,'शाळा स्वच्छता अभियान' राबविण्यात आले.  विद्यार्थ्यांद्वारे शालेय परिसर स्वच्छ करून घेण्यात आले व श्री. जी आर चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजावून सांगितले.दिनांक 11 ऑगस्ट रोजी प्रभात फेरी काढण्यात आली . त्यात इयत्ता पाचवी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रभात फेरी च्या माध्यमातून 'हर घर तिरंगा' विषयी जनजागृती करण्यात आली. दिनांक 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान रांगोळी स्पर्धा, नृत्य स्पर्धा,भाषण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.


दि.12ऑगस्ट रोजी नगर परिषद मुल अंतर्गत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेतील नावे श्री बी एच सलाम, श्री एन एस माथनकर, सौ.भांडारकर यांच्याकडे देण्यात आली.चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक कावेरी अन्वर घोनमोडे, द्वितीय संतवाणी संदावार, तृतीय कामेश्वरी गुंडोजवार यांचा आला.निबंध स्पर्धेत प्रथम दिशा मोहूर्ले, द्वितीय सक्षम गगपल्लिवार, तृतीय पायल फलके यांनी प्रावीण्य मिळविले. तसेच दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक श्री झाडे सर यांच्या हस्ते दररोज ध्वजारोहण करण्यात आले.दिनांक 16 ऑगस्ट रोजी शाळेच्या परिसरात विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11वाजता  सामुहिक राष्ट्रगान घेण्यात आले.या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री झाडे सर , श्रीमती राजमलवार मॅडम पर्यवेक्षिका तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

       अश्या प्रकारे दिनांक 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान 'स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा'निमित्त 'हर घर तिरंगा ' व 'स्वराज्य महोत्सव ' साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती राजमलवार मॅडम पर्यवेक्षिका ,श्री. जी आर चौधरी सर, आर के मुंडरे  सर, आर व्हि डांगरे सर, वी डी मोडक सर, एन एस माथनकर सर, कु.पी पी उमक मॅडम, सौ. वी एस भांडारकर मॅडम, सी बी पुप्पलवार सर, आर बी बोढे सर, कु. डी एस गोंगल मॅडम, कु. एम एन तलांडे मॅडम, पी पी वाळके सर, वी एन निखारे सर, बी एच सलाम सर, टी जी निमसरकार सर, एस पी उरकूडे सर, एस एन चौधरी सर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी श्री अनिल खोब्रागडे व निता कारगिरवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !