बोलेरो ची उभ्या ट्रकला जबर धडक. चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी. पती – पत्नी, साळा व मित्राचा समावेश.

बोलेरो ची उभ्या ट्रकला जबर धडक.


चार जणांचा जागीच मृत्यू ; एक गंभीर जखमी. 


पती – पत्नी, साळा व मित्राचा समावेश.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


सावली :  चंद्रपुर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे रात्रो १०.३० च्या सुमारास बोलेरो ने प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.




        गडचिरोली येथील प्रसिद्ध डीजे वादक पंकज बांगडे हे सावली तालुक्यातील विहीरगाव येथील अनुप ताडूलवार या मित्रा सोबत चंद्रपुर येथे डीजे च्या काही साहित्य खरेदीसाठी बोलेरो गाडी क्र. MH 33 A 5157 ने गेलेले होते. यावेळी अनुपची पत्नी, साळा व एक मित्र हे सोबत होते.


चंद्रपुर वरून साहित्य खरेदी करून परत गावाकडे येत असतानाच सावली तालुक्यातील किसान नगर येथे मुख्य महामार्गावर गाय बसलेली होती. तर त्या गायीला वाचविण्यासाठी कट मारत असतांना स्टेरिंग राळ तुटल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि त्या ठिकाणी उभा असलेला ट्रक क्र. CG 07 BS -7747 ला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघाताचा आवाज इतका जोरदार झाला की किसान नगर व व्याहाड खुर्द येथील नागरिकांनी आवाजाच्या दिशेने काय झाल म्हणून बघण्यासाठी धाव घेत घटनास्थळावर पोहचले. सदर अपघात झाल्याचे बघून नागरिकांनी सावली पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. माहिती मिळताच सावली चे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल होत तेथील स्थानिक नागरिकांची मदत घेऊन त्या अपघात ग्रस्तांना बाहेर काढले. असता तर चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे कळले तर एक गंभीर जखमी झाल्याचे निष्पन्न झाले. मृतकांना व जखमी झालेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय सावली येथे नेण्यात आले.


     सदर या अपघात मध्ये मृत पावलेले पंकज किशोर बांगडे - वय २६ वर्ष, रा. गडचिरोली, अनुप रमेश ताडूलवार – वय ३५ वर्ष, रा. विहीरगाव ता. सावली, महेश्वरी अनुप ताडूलवार – वय २५ वर्ष रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगीरीवार – वय 29 वर्ष, रा. ताडगाव ता. भामरागड जि. गडचिरोली असे मृत झालेल्यांचे नाव असून तर जखमी झालेले सुरेंद्र हरेंद्र मसराम – वय 23 वर्ष रा. चिखली ता. सावली असे नाव आहे. या अपघातात मृत पावलेले अनुप व  महेश्वरी हे पती पत्नी आहेत तर मनोज हा अनुपचा साळा असल्याचे माहिती मिळाली आहे. पंकज बांगडे हे गडचिरोली येथील डीजे संघटनाचे अध्यक्ष होते. तर अनुप व महेशारी हे विहीरगाव येथील माजी सरपंच ताडूलवार यांचा मुलगा व सून होते. या झालेल्या दुर्दैव घटनेने परिसरात शोककळा व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !