मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन तर्फे शैक्षणीक साहित्याचे वितरण
एस.के.24 तास
गडचिरोली : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या सर्वांगीण शिक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत गडचिरोली तालुक्यातील दिभना, या गावात 8 ऑगस्ट ला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मुलांना त्यांच्या अध्यापनात सहकार्य मिळावे, मुलांच्या शिक्षणात रस कायम राहावा व त्यांना शाळेतील अध्यापन करण्यासाठी मदत मिळावी म्हणून मॅजिक बस इंडिया फाउंडेशन या संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्या शैक्षणिक साहित्यामध्ये बॅग,नोटबुक, चित्रकला वही, रंगीत पेपर बॉक्स, रंग कांडी बॉक्स, खडू बॉक्स, पेन,पेन्सिल, खोडरबर, शॉपनर, ब्लॅक बोर्ड, वरील सर्व साहित्याची किट बनवून विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आली. मॅजिक बस इंडिया फाउंडेशन ही संस्था, गडचिरोली जिल्ह्यातील 1200 मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून विकास हा कार्यक्रम राबवित आहे. कार्यक्रमा अंतर्गत जीवन कौशल्य, संवाद कौशल्य, शिकण्यातून शिकणे स्व व्यवस्थापन आदी कार्यक्षेत्रात काम करीत आहे. शैक्षणिक साहित्य कार्यक्रम वितरणाला अध्यक्ष म्हणून दिभना येथील ग्रामपंचायत साचिव कु व्ही. व्ही. देशमुख, विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती गडचिरोली चे लिपिक यु. पी. वेलादी मॅडम, वनरक्षक कु.एस. एल. वाघमारे, दिभना येथील सरपंच रमेश एन गुरनुले, कृषी अधिकारी काणेकर सर, दिभना येथील अंगणवाडी सेविका सुनंदा जेंगठे, अंगणवाडी सेविका निरुपा कोहपरे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दिभना येथील विषय शिक्षक मेश्राम सर , तसेच ग्रामपंचायत सदस्य दिभना धनराज एम जेंगठे, तसेच दिभना येथील पालकवर्ग वैशाली विनोद निकुरे, सुरेखा नजीर जेंगठे , संगीता गणेश जेंगठे, अर्चना गौतम बनीक , उज्वला नरेंद्र सोनुले, कल्याणी रोशन जेंगठे, सोनी नरेंद्र जेंगठे, मयुरी संतोष गेडाम, आशा वर्कर दिभना जया जयराम नैताम ग्रामपंचायत सचिव दिभना व्ही व्ही देशमुख मॅडम यांचे मार्गदर्शन अतिशय मोलाचे ठरले , यादरम्यान मान्यवरांनी अतिशय उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले. अशा रीतीने विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जीवन कौशल्य शिक्षिका मेघा गोवर्धन, यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी सन्माननीय श्री प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाने तालुका समन्वयक सन्माननीय श्री देवेंद्र हिरापुरे सर यांच्या सहकार्याने संपन्न झाले.