हिरापूर येथे जागतिक आदिवासी दिनाचे मोठ्या उत्सहात आयोजन.
🟡 आदिवासी समाज बांधवांचा पुढाकार.l
एस.के.24 तास
कोरपना : तालुक्यातील हिरापूर येथे 9आगस्ट 2022 ला जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन मोठ्या उत्सहात ढोल ताशांच्या व नृत्याच्या गजरात करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुनीताताई तुमराम ह्या होत्या, तर विशेष अतिथी म्हणून युवा भाजपा आदिवासी आघाडीचे नेते माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा. पं. सदस्य श्री. प्रमोदजी कोडापे हे होते, ग्रा. पं. सदस्य श्री. दुर्योधन सिडाम, ग्रा. पं. सदस्य सौ. मायाताई सिडाम, पो. पाटील योगिताताई टिपले आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमांची विधिवत सुरुवात पारंपरिक ढोल वाद्य वाजवून व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली,पारंपरिक गोंडी नृत्यने सुरुवात करण्यात आली. 9 आगस्ट या आदिवासी दिनाचे महत्व व साजरा करण्यामागचे कारण आपल्या मनोगतात श्री प्रमोदजी कोडापे यांनी व्यक्त केले व बदलत्या विज्ञानतंत्र ज्ञानाच्या काळात समजबाधवांनी बदल्ले पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी सुद्धा जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सल्लागागरा बहुद्देशीय आदिवासी विकास मंडळ हिरापूर व आदिवासी समाज बाधवांनी अथक परिश्रम घेतले.
यामध्ये या मंडळाचे अध्यक्ष महेंद कोडापे, उपाध्यक्ष रंजोश सिडाम, अनिल कुमरे सचिव, मारोती मडचापे, कमलाकर आत्राम, बाळा कोडापे, इंदुबाई मडावी, शोभा मडचापे, जीवनकला तुमराम, शारदा मडावी, छाया कोडापे, पुंजाराम कोडापे,सुनील कुमरे, मोहन तुमराम, अर्जुन पंधरे, विलास कोडापे, छत्रपती कोडापे, मारोती कोडापे, सुरेश तुमराम भिमराव सिडाम, मारोती सिडाम,गुलाब सिडाम, विशाल कोडापे, गजानन सिडाम,पुरुषोत्तम कोडापे राधाबाई नयताम, लीलाबाई आत्राम यांनी सहकार्य केले.