केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईच्या विरोधात मुल तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन.

केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या महागाईच्या विरोधात मुल तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन.


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या हुकुमशाही धोरणामुळे दर दिवसाला  वाढणारी महागाई  प्रत्येक वस्तूवर  GST लाऊन केली जाणारी जनतेची आर्थिक पिळवणूक ,वाढती  बेरोजगारी, सैन्यदलातील अग्नीपथ योजना, पेट्रोल,डिझेल,गॅस, जिवनावश्यक वस्तुवरील जी.एस.टी.मुळे जनसामान्यांचे जगणे कठीन केले आहे.


या हुकुमशाही  केंद्र मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी मूल तालुका  काॅंग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेसचे जेष्ठ नेते  संतोषभाऊ रावत अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंक तथा माजी जी. प.अध्यक्ष यांचे नेतृत्वात  दिनांक ५ आगष्ट २०२२ रोज शुक्रवारला  सकाळी १२.०० वाजता मूल शहरातील गांधी चौक महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्या समोर धरणे आंदोलन करून मोदी सरकारचा केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.


 निषेध मोर्चात काँग्रेस नेते संतोषसिंह रावतता लुका काँग्रेस अध्यक्ष,घनश्याम येनुरकर,जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी माजी न.प.उपाध्यक्ष राकेश रत्नावार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष,अखिल गांगरेडीवार,आदर्श सोसायटीचे सभापती, पुरुषोत्तम भुरसे,माजी पंचायत समिती उपाध्यक्ष,दशरथ वाकुडकर,राजू पाटील मारकवार,काँग्रेस ज्येष्ठ पदाधिकारी बंडू भाऊ गुरनुले,कैलाश चलाख, काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष,रूमदेव गोहने,ओबीसी सेलचे गुरुदास चौधरी,सह.सोसायटी केलझर  अध्यक्ष,किशोर घडसे,विनोद आंबटकर ,ग्रामीण काँग्रेसचे राजेंद्र वाढई,धनंजय चिंतावार,हसन वाढई,उपसरपंच दुर्वास कडस्कर,माजी नगरसेवक विनोद कामडी,सरपंच प्रदीप वाढई,कृष्णा सदमवार, रणदिवे,प्रदीप कामडे,पवन नीलमवार,व्यंकटेश पुल्लकवार,अतुल गोवर्धन, संदीप मोहबे,अभिजित चेपुरवार,विक्रम गुरनुले, जवादे,महिला काँग्रेसचे पदाधिकारी,सरपंच,    उपसरपंच,सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ग्रामीण काँग्रेसचे,युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते,रामदास हजारे,मुकुंदा माहाडोळे,उपस्थित होते. याबाबत मुलचे तहसीलदार डॉ.रवींद्र होळी यांना  काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी यांचे उपस्थितीत लेखी निवेदन देण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !