देश आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुर पीडित अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.

देश आझादीचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुर पीडित अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.


विवेक खरवडे!विशेष प्रतिनिधी!एस.के.24 तास


 गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून 6. कि.लो.मीटर अंतरावर असलेल्या मुडझा येथे पुरपीडित शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात 14 आगस्ट रविवारी ला दुपारच्या सुमारास आत्महत्या केली. बंडू नामदेव चौधरी या वय,49 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची स्वतःच्या मालकीची दोन एकर शेती आहे तर दुसऱ्याची दोन एकर धान शेती तो भाड्याने करत होता. 


परंतु सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगेने रौद्र रूप धारण केले आणि नदीच्या पाणीपातळीत वारंवार वाढ झाल्याने पुलखल नजीकच्या नाल्याजवळ असलेली त्याचे धानाचे पीक चारदा पाण्याखाली गेले. तरीसुद्धा त्याने आशा न सोडता दोनदा रोवणे केले परंतु दोनदा धानाचे परे वाहून गेले.


 यामुळे त्याचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले. तरीसुद्धा त्याने धीर सोडला नाही आणि पुन्हा परे टाकले परंतु 13 आगस्ट पासून जिल्ह्यत अतिवृष्टीला सुरवात झाली आणि त्याच्या चिंतेत भर पडली. 14 आगस्ट ला रविवारी तो दुपारच्या सुमारास आपल्या शेतात गेला असता पाण्याखाली आलेले धानाचे परे पाहून आता हा खर्च कसा भरून काढायचा या विवंचनेत तो होता... शेवटी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि शेतातच झाडाला गळफास लावत आत्महत्या केली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !