सततच्या पुरामुळे शेतकरी हवालदिल,हजारो हेक्टर शेती धान पीक जमीनदोस्त,पाचव्यांदा पाण्याखाली शेती गेल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक धक्का.

सततच्या पुरामुळे शेतकरी हवालदिल,हजारो हेक्टर शेती धान पीक जमीनदोस्त,पाचव्यांदा पाण्याखाली शेती गेल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक धक्का.

   


       एस.के.24 तास 

सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : तालुक्यातील जिबगांव हरांबा साजा मध्ये अनेक गावांचा समावेश आहे,यामध्ये प्रामुख्याने नदीकाठच्या जिबगांव,कवठी, उसेगांव, पेडगांव माल,सीर्सी,साखरी, हरांबा, कढोली, लोंढोली व परिसरातील गावात सलग पाचव्यांदा निर्माण झालेल्या महापूर परिस्थितीमुळे धान  पिकास व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झालेला आहे.तसेच शेतकऱ्यांचे  शेती उपयोगी साहित्य पुरामुळे वाहून गेल्याने, हल्ली धान रोवणीसाठी संकट निर्माण झाला आहे, आझादी का अमृत महोत्सवात गुंग असलेले शासन प्रशासन आता तरी लक्ष वेधून घेतील काय ? कारण अजून जिल्ह्यात पालकमंत्री घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकरी वर्गाकडे कुणाचे लक्ष नाही. त्वरित गांभीर्यांनी लक्ष देऊन नुकसानीचा सर्वे करून भरपाई देण्यात यावी,अशी मागणी  परिसरातील शेतकरी करीत आहेत.


मागील काही दिवसात घेतलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली. गोसेखुर्द धरण 33 व संजय सरोवर धरण 4 दरवाजे कालपासून त्याचे  उघडल्याने यांनी प्रचंड महापूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठी गावांना पुराचा सामना करावा लागत आहे.जिबगांव,कवठ,उसेगांव, हरांबा, उमरी, डोनाळा, कढोली, लोंढोली, साखरी, सीरसी,  अशा इतर गावापासून पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. 


त्यामुळे सर्व परिसरामधील पिके पाण्याखाली गेलेले आहेत. याकडे शासन व प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन शेत पिकांचा सर्वे करून त्याचे नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !