जिल्हा आरोग्य यंत्रनेने काढले फर्मान ; आरोग्य कर्मचारी मुख्यालईन राहावे..!

जिल्हा आरोग्य यंत्रनेने काढले फर्मान ; आरोग्य कर्मचारी मुख्यालईन राहावे..!


जिबगाव आरोग्य सेवेची दैनावस्था.


मुख्यालयात आरोग्य कर्मचाऱ्याचा अभाव ; तालुक्यात तापाचे थैमान.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) तालुक्याच्या जिबगाव येथील आरोग्य केंद्रातिल कर्मचारी मुख्यालईन राहत नाही त्यामुळे आरोग्य सेवेचि दैनावस्था निर्माण झाली बदलत्या वातावर्णामुळे सर्वत्र तापाचे थैमान सुरु असताना कोठयावधिच्या निर्माण झालेल्या जिबगाव येथील आरोग्य केंद्रात कर्मचा ऱ्याचा अभाव दिसुन येत आहे परिणामी आलेल्या रुग्णानाना रेफर शिवाय पर्याय नाही मग कोठयावधि ची बनलेली जिबगाव येथील आरोग्य सेवा क़ाय कामाची या संदर्भात ग्रा प सदशय  राकेश गोलेपलिवार यानी आरोप केला होता  या संदर्भात जिबगाव येथील आरोग्य सेवेचि दैनावस्था या मथलळया माध्यमानी वृत्त प्रकाशित करताच खळबळलेल्या जिल्हा आरोग्य यंत्रनेने तालूका आरोग्य सेवेला फर्मान काढून जिबगाव आरोग्य केंद्राति कर्मचारी मुख्यालईन राहावे असे आदेश काढल्याचे वृत्त आहे सावली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.  तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी असल्याने कर्मचाऱ्यावर वचक नसल्याचे बोलले जात आहे. 


आरोग्य सेवा सुरळीत राहून रुग्णांना आरोग्य विषयी अडचण निर्माण होणार नाही.  म्हणून शासन आरोग्य यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करते.  ग्रामीण  भागात आरोग्य सेवा पोहचावी या हेतूने शासनाने प्राथमिक आरोग्य स्वास्थ्य केंद्राची निर्मिती केलेली आहे.  सावली तालुक्यात एकुन ६ आरोग्य केंद्र व १ ग्रामीण रुग्णालय आरोग्य सेवे करीता आहे.  तालुक्यातील आरोग्य केंद्रामध्ये एम बी बी एस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केल्या गेली आहे.  परंतु ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची बाब लक्षात आली आहे.प्रा आरोग्य केंद्र जिबगांव येथे काही कर्मचारी यांचे रिक्त पदे आहेत तर कर्मचारी सुध्दा मुख्यालय राहत नसल्यामुळे साध्या आजाराला  रेफर करीत असल्याची ओरड नागरिकांमध्ये होत आहे. काही  प्राथमिक स्वास्थ केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.  त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ही कोलमडली असल्याचे  निदर्शनास दिसुन येते आहे. 


तालुक्यातील जिबगांव,  परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत मात्र रात्रीच्या वेळेस अधिकारी कर्मचारी हजर राहत नसल्याचे बोलले जात आहे.  वेळेवर उपचार न झाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही या परिसरात घडलेल्या आहेत.  तर रुग्णांना योग्य मीळत नसल्याचे बोलले जात आहेत.  त्यामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत संबंधित विभाग उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे.  अनेक रुग्णांना सावली किंवा गडचिरोली येथे रेफर केल्या जात असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.  अशा गंभीर बाबीकडे संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामीण भागातून केल्या जात आहे.


मध्यमाना जिबगाव येथील आरोग्यची सेवेचि दैना वस्था या मथळया खाली एस.के.24 तास बातमी प्रकाशित होताच जिल्हा आरोग्य सेवेने या संदर्भात दखल घेत जिबगाव येथील आरोग्य सेवेचे कर्मचारी मुख्यालईन राहावे असे फर्मान काढले आहे.गावात तापाची साथ असताना किती कर्मचारी मुख्यालईन राहतात तो येणारा काळ ठरवेल.

 राकेश एम.गोलेपल्लीवार ग्रामपंचायत सदस्य,जिबगांव


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !