जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या प्रलंबित प्रकरण तात्काळ सोडवा अन्यथा आंदोलन करू - भारतीय क्रांतिकारी संघटनेचा इशारा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत कामगारांची नोंदणी प्रक्रिया व कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे परंतु एकिकडे अद्यापही कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या समस्याचे निराकरण झालेले नाही. याकडे कामगार विभाग चंद्रपुर याचां निष्काळजीपणा हा कामगारांचे डोकेदुखी बनलेला आहे. ग्रामीण भागातील तालुक्यातील कामगारांना पैसे खर्च करून वारंवार कार्यालयात चकरा मारून सुद्धा कामगार नोंदणी न होणे यामुळे कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विनकोब्रा यानीं कामगाराच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत.
कामगार विभाग आयुक्त यांनी समस्याची तात्काळ पुर्तता करण्यात यावी. बांधकाम कामगार दाव्यासाठी प्रलंबित आनलाईन नोंदणी अर्ज मंजूर करून अद्ययावत करा, जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील कामगारांनी मागील एक दोन वर्षापासून भरलेली आनलाइन नोंदणी अर्ज प्रलंबित आहेत अशाना कारण न देता रिजेक्ट केले जात आहे. ते रिजेक्टचे कारण देऊन अर्ज मंजूर करण्यात यावे, वेबसाइटवर लिंक बंद राहणे, फार्म अपडेट न होणे, सबमिट न होणे इतर अडचणी दूर करा, तात्काळ विशेष नोंदणी अधिकारी नियुक्त करा, कामगार विभागांतर्गत जिल्ह्यात मनरेगा, बाधंकाम कामगारांना दोन वेळचे जेवण मिळत होते ते कित्येक ठिकाणी बंद झाले पंरतु कंत्राटदार बोगस बिल काढून जेवन देल्याचे निदर्शनास येत असल्याने कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी या मागण्याचे निवेदन भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने कामगार विभाग आयुक्त चंद्रपुर यांना देण्यात आले. तात्काळ दख्खल घेऊन समस्या सोडविण्यात यावे अन्यथा कार्यालयासमोर उग्र आंदोलन करू असा इशारा याप्रसंगी भारतीय क्रांतिकारी संघटनेनी दिला.
यावेळी निवेदनकर्ते भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा,उपसरपंच पाटील वाळके,सुरेंद्र ढोकणे,अमोल गेडाम व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.