शालेय व्यवस्थापन समिती च्या अध्यक्ष पदी श्री. नितेश रस्से तर उपाध्यक्ष पदी सौ. कविता निकेसर यांची निवड.
जि.प.शाळा क्र .१ ची शालेय व्यवस्थापण समिति गठित.
एस.के.24 तास
सावली : (लोकमत दुधे) जिल्हा परिषद उच्च श्रेणी प्राथमिक शाळा क्र. १ सावली येथे दिनांक २९ आगस्ट २०२२, सोमवारी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शालेय व्यवस्थापन समिती ची निवड करण्यात आली. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी श्री. नितेश हेमकांतजी रस्से तर उपाध्यक्ष पदी सौ. कविता विलासजी निकेसर यांची एक मताने निवड करण्यात आली.त्यात सदस्य म्हणून सौ योगिता सुरेश निकोडे, श्री प्रकाश लोनबले, श्री उमाकांत वाढई, श्री नरेंद्र राऊत, श्री संतोष कस्तुरे, श्री सचिन मुपिडवार, श्री अमित मोहूर्ले, श्री मारोती गुरनुले, सौ मिना आदर्श गेडाम , सौ हेमलता वलके ,सौ ज्योती सुरेश संतोषवार मुख्याध्यापिका, सौ शामल तोटावार शिक्षिका, दिप्ती मुकुंदा मेश्राम अंगणवाडी सेविका याची निवड करण्यात आली . या वेळी पालक वर्ग मोठया संखेने उपस्थित होते नव निर्माण समितीचे अभिन्नदन करण्यात आले असून पुढील कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.