वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला माजी कॅबिनेट मंत्री,विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत.

वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला माजी कॅबिनेट मंत्री,विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडून आर्थिक मदत.


       सुरेश कन्नमवार                                          मुख्य संपादक - एस.के.24 तास 


 सावली : हिरापूर येथे दिनांक ११ आगस्ट २०२२ ला सायंकाळच्या सुमारास किसान नगर येथील शेतकरी श्री सुरेश ठय्ये (पेढा) यांच्या शेतीला धान पिकाला बाशी मारण्यासाठी गेलेल्या हिरापूर येथील शेतकरी श्री भक्तदास श्रीरंग झरकर यांचेवर वाघाने हल्ला केला होता.या हल्ल्यात श्री,भक्तदास झरकर यांचा जागीच मृत्यू झाला होता. 

            

सदरची माहिती माजी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांना माहिती होताच मृतकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत पाठवली.सदर आर्थिक मदत हिरापूर गावच्या प्रथम नागरिक सौ.प्रीती गोहणे यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,संजय सायमावार, उपसरपंच शरद कन्नाके, ग्रा.प.सदस्या सौ नीता मुनघाटे, ग्रा. प. सदस्या यशोदा देशमुख, केशरी मुनघाटे व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

            माननीय माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमीच जनसामान्य,गोर गरीब नागरिकांना मदत करीत असतात याची प्रचिती पुन्हा एकदा हिरापूर येथे दिसून आली.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !