चिमुर क्रांतीभूमी व शहिदांच्या सन्मानार्थ आणि विकासासाठी दाभेकर उपोषण विकृत नेत्याना बोचले ! डार्विन कोब्रा संस्थापक अध्यक्ष,भारतीय क्रांतिकारी संघटना.

चिमुर क्रांतीभूमी व शहिदांच्या सन्मानार्थ आणि विकासासाठी दाभेकर उपोषण विकृत नेत्याना बोचले ! डार्विन कोब्रा संस्थापक अध्यक्ष,भारतीय क्रांतिकारी संघटना.


एस.के.24 तास


चिमुर : 16 ऑगष्ट चा उपमुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम म्हणजे चिमूरकरांच्या स्वातंत्र्यावर गदा म्हणावे लागेल. देशात ज्या प्रमाणे मंत्र्यांना, नेत्यांना सामाजिक कार्याचे, कार्यक्रम घेण्याचे व  जनतेकरिता आंदोलन करण्याचे जे स्वातंत्र्य आहे त्याच प्रकारे देशातील सर्वांना असे संविधानिक स्वातंत्र्य आहे.  उपमुख्यमंत्री 16 ऑगष्ट ला  चिमूर येथे खरोखरच  शहिदांना श्रद्धांजली वाहण्यास आले होते काय की स्थानिक कर्तव्यशून्य नेत्याची स्तुती करण्यास आणले होते ? की बनवाबनवी करून गद्दारांच्या सत्तेची नशा दाखविण्या साठी आले होते ? भारतीय क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सारंग दाभेकर यांच्या उपोषणाचा   उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासोबत कुठलाही संबंध नव्हता.  त्यांच्या कार्यक्रमाचा सारंग दाभेकर यांनी निषेध करायचे ही ठरवले नव्हते. उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम घ्यावे व इतरांनी कोणतेही कार्यक्रम घेऊ नये असा काही कायदा नाही. तरी सुध्दा चिमूरच्या अनेक समस्यांना घेऊन राज्य व केंद्र सरकार चे लक्ष वेधन्या करिता सारंग दाभेकरांनी आज 16 ऑगष्टला सकाळी सहा वाजता शहिदांच्या मुख्य स्मारकाला विनम्र अभिवादन करून शांततेत उपोषणाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम स्थळापासून उपोषण दोन ते अडीच किलोमीटर पर्यंत दूरवर  होते. त्यातही ते एकटेच उपोषणाला बसलेले होते. त्यांनी उपोषणाची रीतसर माहिती  तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक व नगरपरिषदेच्याा मुख्याधिकारी यांना लिखित दिली होती. ते उपोषणाला बसेपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषण न करण्याबाबत काही एक दाभेकरांना कळवले नाही. मात्र अचानक नऊ वाजता स्थानिक पोलीस विभागामार्फत  उपोषणाचा भंग करून दाभेकरांना जबरदस्तीने ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध केले. त्यामुळे स्थानिक समाज कार्यकर्त्यांनी लोकांच्या समस्या किंवा लोक कल्याणाकरिता लोकशाहीतील उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन करू नये काय ? काय आम्हाला हा अधिकार नाही की स्वातंत्र्य नाही ? असे प्रश्न निर्माण झाले असून ते अनुत्तरीय आहेत. ज्या विकृत मानसिकतेच्या सत्ताधारी नेत्यांनी हे उपोषण उधळण्यास पोलिस विभागाला आदेशित केले असेल अशा नालायक नेत्याचा मी या ठिकाणी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करीत आहो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाकरिता जर स्थानिकांचे स्वातंत्र्य हिरावले जात असेल तर अशा नेत्यांनी परत चिमूरला येण्याचे स्वप्न पाहू नये किंवा स्वतः हून येऊ नये.  कायदेशीर व नियमानुसार असलेले उपोषण उधळून उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम एक तमाशा ठरलेला आहे. चिमूर क्रांतीभूमी आणि शहिदांची टिंगल ठरलेली आहे. कारण भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपोषण सुद्धा शहिदांच्या व क्रांती भूमीच्या सन्मानाकरिता तसेच चिमूरच्या सर्वांगीण विकासाकरिता केलेले होते.  उपोषणामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर तीळ मात्र फरक पडला नसता ना सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला त्रास देण्याचे हे एक नालायक नेत्याचे षडयंत्र आहे. पैशाच्या जोरावर शांत आणि संयमी संघटनेच्या सामाजिक कार्यकर्त्याला डिवचण्याचा प्रकार चुकूनही कोणी करू नये. जगात तुमच्या पेक्षा शंभर पटीने धनवान असलेल्यांना लोकांनी धडे शिकविलेले आहेत व त्यांचा अहंकार उतरविलेला आहे हा इतिहास पण लक्षात घ्या. हवेतून चालू नका आणि दुसऱ्यांना कमजोर ही समजू नका. सत्य, इमानदारी आणि  निस्वार्थाने केलेल्या सामाजिक कार्याची ताकद एक वेळ तुम्हास कळेल.

तुमच्या दडपशाहीने भारतीय क्रांतिकारी संघटनेचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !