स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा,महापुरुषांच्या वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांची मानवंदना.

स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा,महापुरुषांच्या वेशभूषा साकारत विद्यार्थ्यांची मानवंदना.


एस.के.24 तास 


चिमुर : दि.१५ आॕगस्ट २०२२ रोजी जि.प.उच्च प्राथ.शाळा,खेमजई बिट-शेगाव(बु.) पंस.वरोरा येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा होत असतांना पावसाच्या अमृत धारांनी देखील साथ संगत केली.त्यामुळे आजचा सोहळा हा रंगीबेरंगी छत्रींनी नटलेला दिसला.


खेमजई शाळेतील चिमुकली मंडळी आज प्रभातफेरीचे आकर्षण ठरली.हर्षल नितेश नन्नावरे,वर्ग ३रा या विद्यार्थ्याने महात्मा गांधीजींची,कु.सानिया विलास चौधरी वर्ग २ रा ही सावित्रीबाई फुले,कु.पलक हरिचंद्र बुरडकर वर्ग ४था ही राणी लक्ष्मीबाई,क्रिष्णा प्रविण तुमसरे,वर्ग ५ वा हा गाडगे महाराज आणि जगदिश दत्तू दडमल,वर्ग ७वा या विद्यार्थ्याने महात्मा फुले यांची वेशभुषा धारण केली.यावर्षीपासून एका नव्या उपक्रमात भर घालत... कु.नियती शेषराव चौधरी,वर्ग ७वा हिने ग्रामपंचायत खेमजई येथे सुत्रसंचालन केले.कु.मोनिका तुळशिराम तुमसरे,वर्ग ७वा हिने जबरदस्त पथसंचलन करीत मा.सरपंचा सौ.मनिषाताई चौधरी यांना मानवंदना दिली.विद्यार्थीनींनी झेंडागीत सादर केले.बौद्ध विहाराच्या प्रांगणात कु.काव्या प्रशांत गायकवाड,वर्ग ७वा हिने सुत्रसंचालन केले.म.फुले आणि डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पुजन सौ.मनिषा चौधरी आणि उपसरपंच श्री.चंद्रहास मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.शेवटी प्रभातफेरी जि.प.उच्च प्राथ.शाळेच्या प्रांगणात आली.कु.श्रावणी जगदिश चौधरी वर्ग ६वा हिने सुत्रसंचालन केले.कु.मोनिका तुमसरे (क्रिडामंत्री) हिने शा.व्य.स.अध्यक्ष मा.श्री.गुणवंत कापटे यांना पथसंचलन करीत मानवंदना दिली आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहन सोहळा पार पडला.अनेक विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून भाषणे केली.ज्या विद्यार्थ्यांनी थोरांची वेशभुषा धारण केली होती,त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.रामकृष्ण बलकी यांनी मनोगत व्यक्त केले.श्री.रविंद्र साखरकर (स.शि.) यांनी शाळेतील उपक्रम आणि योजनांवर प्रकाश टाकला.श्री.संजू जांभुळे (स.शि.) यांनी आभार प्रदर्शन केले.तेजस्विनी ग्रामसंघ,खेमजई यांच्या तर्फे गोपाळांची पंगत आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला मंडळे,तलाठी मॕडम,आरोग्य कर्मचारी,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत सदस्य,माजी पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रभातफेरीची शिस्त सांभाळण्यासाठी सौ.चेतना मून(स.शि.) आणि श्री.अनिल वाघमारे(वि.शि.)यांनी आपली भूमिका पार पाडली.सर्वांसाठी ग्रामसंघातर्फे नाश्त्याचे आयोजन करण्यात आले आणि प्रसादाचे वाटप करून हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.


भारता तुझे सामर्थ्य

 सदा बळकट असू दे,

 निळ्या आसमंती तिरंगा

 डौलाने फडकत असू दे.


शब्दांकन✍️ 

ELT

ईश्वर लक्ष्मणराव टापरे

(स.शि.)जि.प.उच्च प्राथ.शाळा,खेमजई

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !