अखेर २६ तासानतर मिळाले काजल चे मृत शव. ★ भावंडाना वाचविन्याच्या प्रयत्नात गमविला जीव.

अखेर २६ तासानतर मिळाले काजल चे मृत शव. 

 

★ भावंडाना वाचविन्याच्या प्रयत्नात गमविला जीव. 


★ वि.दा.सावरकर आश्रम शाळा चांदाळा येथील ५ व्या वर्गाची होती  विद्यार्थिनीच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर.


एस.के.24 तास


सावली : (लोकमत दुधे) कपड़े धुन्यासाठी गेलेले भावंड आसोलामेंढा मुख्य नहरात वाहत जात असताना जवळच असलेली  काजल ने भावंडाना वाचविन्याच्या नादात नहरात उड़ी घेतली नाजिकच्या लोकांनी ईतर  चार लोकानां बाहेर काढण्यात यश आले असले तरी काजल मात्र बेपत्ता झाली आज रोजी शनिवार १२ वाजताच्या सुमारास म्हणजे २६ तासानतर काजल चे मृत शव सिंगापुर ते भोवर्ला यांच्या माधोमध नळसळी जवळ मिळाले मृतका काजल ही विनायक दामोदार सावरकर आश्रम शाळा चांदाळा येथील वर्ग ५ मधील विद्यार्थिनी होती आणि पोळया च्या निमित्याने सावली ला आली होती कायम स्वरूपी चामोर्शी येथे वास्तव्य असलेला मृतक काजल चा परिवार एक वर्ष्या पासून सावली ला स्थाईक झाला होता.

रोजगाराच्या निमित्याने नेहमी भटकत असलेला हा परिवार सावली येथे येऊन मिळेल ते काम करुण आपल्या कुटुंबाचा प्रपंच भगवित होता एक मुलगा  दोन  मूली  आई वडील असा हा परिवार असून मृतक काजल ही मजवी मुलगी होती घटनेच्या दिवशी सावली लगत वाहना ऱ्या आसोलामेंढा मुख्य नहर सिंचाही विभाग जवळ असलेल्या धुने घाट मुख्य नहर येथे कपड़े धुन्यासाठी मृतक काजल आणि तिचे भावंङ गेले होते सोभतच गावातील नहरा लगत काही महिला असताना मृतक काजल ची भावंङ वाहत गेली होती परिणामी 

सावली शहरातील आसोला मेंढा नहरात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आपल्या आई सोबत इतर ही बालके सोबत असतांना चार बालके  नहरात आंघोड करीत होते.मात्र नहरात आपले बहीण व भाऊ बुडत असल्याचे लक्षात येताच तिथे असलेली काजल ने उडी मारली व वाचविण्यासाठी प्रयत्न करीत होते.मात्र बालके बुडत असल्याचे एकच कल्लोड झाल्याने बाजूला असलेल्या शासकीय धान्य गोडावून मधील मजूर बालू भंडारे यांनी त्वरित त्या नहरात उडी मारली व त्याने चार जणांना बाहेर काढण्यात यश आले मात्र काजल ही वाहत गेली शुक्रवारी

 सकाळी १० च्या सुमारास  ही सदरची घटना असून 

रोहित अनिल मेडपल्लीवार १३ वर्ष

अमित अनिल मेडपल्लीवार ११ वर्ष 

राहुल अंकुश मक्केवार १० वर्ष 

सुश्मिता अंकुश मक्केवार १२ वर्ष रा सावली  यांना बाहेर काढण्यात यश आले असून कु.काजल अंकुश मक्केवार १२ वर्ष  ही मुलगी वाहत गेली आहे.तिची शोध मोहिम बचाव पथका मार्फत सुरू आहे घटनेची माहिती होताच सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांना देण्यात आली.त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत आपल्या चमू सह मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला दिवस भर शोधमोहिम सुरु होती वाहत गेलेल्या काजल ची शोध मोहिम बचाव पथका मार्फत सुरु होती सावली ते तीन कवाड़ी ते भोवर्ला या भागात बचाव पथक ते परिवारा कडून शोध घेतला जात होता मात्र आज शनिवार  रोजी १२ वाजताच्या दरम्यान मृत काजलचे  शव मिळाले  मुख्य नहरालगत या भागात परिसरातील जनतेची मोठी गर्दी दिसुन येत होती काजलच्या अकाली निधनाने परिवारात दुःखाचे डोंगर कोसळले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केलि जात आहे मृतक काजल च्या पश्च्यात वडील आई   एक मुलगा दोन मूली असा आप्त परिवार आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !