कर्तव्यावर असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना सावली तालुका भाजपा महिला आघाडी तर्फे बांधल्या राख्या.

कर्तव्यावर असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांना सावली तालुका भाजपा महिला आघाडी तर्फे बांधल्या राख्या.


एस.के.24 तास


सावली : सर्वसामान्य जनसेवेत सदैव तत्पर असलेल्या सावली तालुक्यातील तहसील कार्यालय सावली,पोलीस स्टेशन सावली, ग्रामीण रुग्णालय सावली,प्राथमिक आरोग्य केंद्र जीबगाव,पोलीस स्टेशन पाथरी,प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथील सर्व कर्मचारी वृंद यांना रक्षा बंधन निमित्य राखी बांधण्यात आली.


कामाच्या व्यापामुळे अनेक बंधू हे आपल्या बहिनीकडून राखी बांधण्यासाठी जावू शकत नाही मात्र भाजपाच्या या बहिणी मात्र आम्हाला राखी बांधून आम्हाला बहिणींचे प्रेम दिले या बद्दल अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी भावना व्यक्त करून सर्व उपस्थित महिलांचे आभार मानले.व भाजपा तालुका महिला आघाडी चे संघटनेचे कौतुक केले.


या अभिनव उपक्रमाची सुरुवात  जिल्हा भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष तथा नगरसेविका नीलम सुरमवार यांच्या नेतृत्वात  भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुष्पा शेरकी,भाजपा महिला सावली शहराध्यक्ष गुड्डी सहारे, माजी जी. प. सदस्य मनिषाताई चिमुरकर, शोभाताई बाबनवाडे, प्रतिभाताई बोबाटे ,छायाताई चकबंडलवार, सिधुताई मराठे, शेवंता  बाबनवाडे, रुचिता ठाकूर पदाधिकारी सह अनेक महिला कार्यकर्ते उपस्तीत होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !