शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न.

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक संपन्न.   


नितेश मँकलवार!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास


मुल : आज दि.10/08/20220 ला नवभारत विद्यालय मुल येथे लोकशाहीच्या माध्यमातून शालेय मंत्रिमंडळ निवडणूक पार पडली. निवडणूक म्हणजे काय? मोठी  माणसे मतदान कसे करतात? ईव्हीएम मशीन कशी असते? मतमोजणी कशी करतात? शाई का लावतात? आणि एकूण प्रक्रिया कशी असते? असे अनेक प्रश्न विद्यार्थी शाळेतील शिक्षकांना सतत विचारत असतात. त्यावेळी शाळेतील  शिक्षक  यांनी शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्षात राबविण्याचा निर्णय सहकारी शिक्षकांना बोलून दाखवला आणि ही प्रक्रिया राबविली.


पाचवी ते दहावी पर्यंतसाठी प्रत्येक वर्गासाठीची विविध पदे सांगून वर्गस्तरची निवडणूक  घेण्यात आली. यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, शिक्षण, आरोग्य ,स्वच्छता, पर्यावरण , क्रीडा, अशी पदे निवडली गेली. सोबतच त्यांची कामे सांगून जबाबदारी देण्यात आली आणि शाळेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री व इतर  पदासाठी निवडणूक घ्यायची तयारी केली. या पदासाठी  विद्यार्थी उमेदवार इच्छुक होते. त्यांना एक दिवस प्रचार करण्यासाठी वेळ दिला. मतदान प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे पार पडली.


           निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना कामे कशी करायची, शिक्षकांना मदत केव्हा करावी, शिस्त व स्वच्छता ठेवण्यासाठी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याध्यापक श्री.झाडे सर, श्रीमती राजमलवार मॅडम,जेष्ठ शिक्षक श्री. मुंडरे सर, श्री. गुरुदास चौधरी सर, श्री. डांगरे सर व इतर सहकारी शिक्षक, शिक्षिका यांनी केले.     मतदान अधिकारी श्री. बी एच सलाम, एस एन चौधरी, सौ. भांडारकर, व्ही. डी. मोडक, व्ही एन निखारे, टी जी निमसरकार, एस एन उरकुडे, आर व्हीं डांगरे, जी आर चौधरी, एन एस माथनकर , कु. पी. पी उमक , पी पी वाळके, आर बी बोढे, सी बी पुप्पलवार, डी एस गोंगल, एम एन तलांडे या शिक्षकांनी निवडणुक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडली.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !