व्याहाड खुर्द पंचायत समिती साठी इच्छुकांची भाऊगर्दी.

व्याहाड खुर्द पंचायत समिती साठी इच्छुकांची भाऊगर्दी.

       

सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!के 24 तास


सावली : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2022चे आरक्षण सोळत नुकतीच तहसील कार्यालय सावली येथे काढण्यात आली. त्यात व्याहाड खुर्द पंचायत समितीचे आरक्षण हे सर्वसाधारण असल्याने काँग्रेस पक्ष्याची उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी अनेकांची इच्छा असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.    


सावली पंचायत समिती चे माजी सदस्य सौ. मनीषा जवादे यांचे पती दिपक जवादे यांनी दावेदारी केली आहे. ते सध्या व्याहाड खुर्द विविध सेवा सहकारी संस्था चे अध्यक्ष असून सेवा सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील व्याहाड खुर्द, किसान नगर, मोखाळा, कोंडेखल व केरोडा ही गावे येत असल्यामुळे आपला विजय पक्का आहे त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहे. तसेच  व्याहाड खुर्द ग्राम पंचायत चे माजी सरपंच तथा सदस्य व विविध सेवा सहकारी संस्था व्याहाड खुर्द चे संचालक केशव भरडकर यांनी सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहे.      


व्याहाड खुर्द पंचायत समिती क्षेत्रात व्याहाड खुर्द, मोखाळा, केरोडा व कोंडेखल ही ग्रामपंचायत अंतर्गत गावे येत असून मोखाळा येथील संजय गांधी निराधार योजना समिती चे सदस्य व माजी उपसरपंच अनिल मश्याखेत्री यांनी सुद्धा आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून पक्षश्रेष्टीकडे मागणी केली असल्याची विश्वनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे.  


                सदर पंचायत समिती अंतर्गत गावाचा विचार करून पक्षश्रेष्टी कोणला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !